‘या’ आहेत दाक्षिणात्य चित्रपटातील सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्री, नं ८ची तर आहे खूपच ग्लॅमरस

दाक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये सुंदर आणि उत्तम अभिनय करणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. त्या खूपच लोकप्रिय आहेत. त्यांच्या सौंदर्याने सर्वजण घायाळ झाले आहेत. करोडो लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्री कोण आहेत चला पाहूया.

१. नित्या मेनन- अभिनेत्री नित्या मेनन ही एक भारतीय अभिनेत्री आणि पार्श्वगायिका आहे. तिने तिच्या दमदार अभिनयनाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिने बऱ्याच भाषेतील चित्रपटांमध्ये कामे केली आहेत.

कन्नड, मल्याळम, तेलगू, आणि तामिळ या चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय केला आहे. तिचा तेलगू चित्रपट ‘गुंडे जारी गलांथीयंड’ आणि मल्ली मल्ली इधी रानी रोजू या चित्रपटाकरिता तिला २ फिल्मफेयर पुरस्कार देखील मिळाले आहेत. तिने एकूण ४७ चित्रपटांमध्ये काम केले आहे.

२. नयनतारा- प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा ही टॉलिवूडमधील सर्वात सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. तिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. ती प्रामुख्याने मल्याळम, तामिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम करते.

तिने २००३ मध्ये ‘मनासिनाकाडे’ या मल्याळम चित्रपटातून तिच्या अभिनय करिअरला सुरुवात केली. तिने बऱ्याच चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. चंद्रमुखी, गजनी, यारडी नी मोहिनी, बिल्ला हे तिचे गाजलेले तमिळ चित्रपट आहेत.

३. रकुल प्रीत सिंह- प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल असून ती प्रामुख्याने तेलगू चित्रपटांमध्ये काम करते. रकुलने महाविद्यालयापासूनच मॉडेल आणि अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. २००९ मध्ये तिने कन्नड चित्रपट गिली मधून टॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

तिने तेलगू तामिळ कन्नड, आणि हिंदी चित्रपटांमध्ये प्रामुख्याने दिसून आली. २०१४ मध्ये तिने यारीया या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक केले गेले. तेलंगणा राज्याच्या सरकारने बेटी बचाओ, बेटी पढाओ या कार्यक्रमासाठी तिला ब्रॅड अँबेसेडर म्हणून तिची निवड केली आहे.

४. तापसी पन्नू- तापसी पन्नू ही टॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. २०१० साली तिने एका तेलगू सिनेमामध्ये भूमिका करून आपल्या अभिनय करियरला सुरुवात केली. तिने तेलगू, तामिळ, मल्याळी, हिंदी चित्रपटांमध्ये प्रामुख्याने काम केले आहेत. तिने चष्मे बद्दूर या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

५.अनुष्का शेट्टी- प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शेट्टीने दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ती एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती प्रामुख्याने तेलगू आणि तामिळ चित्रपटांमध्ये काम करते.  अनुष्का ही सर्वात मानधन घेणारी अभिनेत्री आहे. तिच्या सौंदर्याने तिने चाहत्यांना घायाळ केलेलं आहे.

तिला तीन सिनेमा पुरस्कार, नंदी पुरस्कार, टीएन स्टेट फिल्म अवॉर्ड्स आणि तीन फिल्मफेअर अवॉर्ड्स आठ नामांकनांमधून मिळाले आहेत. बाहुबली या गाजलेल्या चित्रपटामुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली आहे.

६. श्रुती हासन – श्रुती हासन हि कमल हासन आणि सारिका ठाकूर यांची मुलगी आहे. श्रुती एक तामिळ चित्रपट अभिनेत्री, गायिका, संगीतकार आहे. तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये कामे केली आहे. गब्बरसिंग, वादळं, श्रीमंथुडू, आणि सी ३ यातील अभिनयामुळे तिने प्रेक्षकांची मने जिंकली.

तिला रेस गुररामी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट तेलगू अभिनेत्रीचा फिल्मफेयर अवॉर्ड देखील मिळाला आहे. तिने गब्बर इज बॅक , रमैया वस्तावैय्या, वेलकम बॅक या हिंदी चित्रपटामध्ये कामे केली आहेत.

७.तमन्ना भाटिया- तमन्ना तामिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. तिने तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केले आहे. ती अनेक हिंदी चित्रपटांत देखील दिसली. तिने अयान, पायया, सिरुथाई, वीरम, धर्म दुराई, स्केच या तामिळ चित्रपटांत अभिनय केला आहे.

तेलगू चित्रपटांमध्ये १००% लव्ह, रचना थडका, बाहुबली द बिगनिंग, बंगाल टायगर, ओओपिरी, बाहुबली २: द कनक्लुजन यात काम केले आहे. ती दक्षिण भारतीय चित्रपटातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.तिने आतापर्यंत सुमारे ६५ चित्रपटांमध्ये काम केले आहे.तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात आपले एक अढळ स्थान निर्माण केले आहे.

८. समेंथा प्रभू- टॉलिवूडमधील सर्वात सुंदर दिसणाऱ्या यादींमध्ये समेंथा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिला चार फिल्मफेयर पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ती दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत एक आघाडीची अभिनेत्री आहे.

तिने तेलगू चित्रपट ये माया चेसावे मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटामुळे तिला सर्वोत्कृष्ट पदार्पन अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तिला सर्वोत्कुष्ट तामिळ अभिनेत्रीचा आणि सर्वोत्कृष्ट तेलगू अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला आहे.

९.काजल अग्रवाल- टॉलिवूडमधील सर्वात सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत काजल अग्रवालचा प्रथम क्रमांक आहे. काजल एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने तामिळ, तेलगू, आणि हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. काजलने क्यूँ! हो गया ना या चितपतच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००७ मध्ये तिने लक्ष्मी कल्याणम या चित्रपटातून तेलगू मध्ये पदार्पण केले.

तिचा चंदामामा या हिट चित्रपटातून आपली ओळख निर्माण केली. तीचे मगाधीरा या तेलगू चित्रपटातील अभिनयाचे कौतुक केले गेले. तिने अनेक सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींचे नामांकन मिळवले आहे. डार्लिंग, ब्रिन्दावनम, मिस्टर परफेक्ट, बिझनेसमन सारख्या तेलगू चित्रपटांमध्ये तिने अनेक भूमिका बजावल्या आहेत. तिचा स्पेशल २६ चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता.

Leave a Comment