खाली पहा विवेक ओबरायचे आत्ताचे फोटो…

एकेकाळी हँडसम हिरो म्हणून त्यानं मुलींच्या मनावर अधिराज्य गाजवलं. रोमँटिक हिरो अशी त्याची इमेज होती. पण काही कारणाने मध्यंतरी तो सिनेमाक्षेत्रापासून लांब गेला. तो म्हणजे विवेक ओबेरॉय.

विवेकानंद ओबेरॉय हा एक भारतीय अभिनेता आहे जो प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये दिसतो. राम गोपाल वर्मा यांच्या कंपनी या चित्रपटामधून त्याने  चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.या सिनेमासाठी त्याला दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.

विवेक ओबेरॉयचा जन्म हैदराबाद, तेलंगणा येथे झाला. त्याचे वडील ओबेरॉय हे  सिनेमात सहायक अभिनेते  म्हणून काम करत होते  तर त्याच्या आई यशोधरा या  तामिळ कुटुंबातील आहे. विवेकने मेयो कॉलेज, अजमेर आणि मिठीबाई कॉलेज, मुंबई येथे शिक्षण घेतले.  लंडनमधील एका अभिनयाच्या कार्यशाळेत, न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीच्या संचालकाने त्याला पाहिले, आणि तो  विवेकला न्यूयॉर्कला घेऊन गेला, जिथे त्याने चित्रपट अभिनयात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. विवेकने भारतात पटकथा लेखक म्हणूनही काम केले आहे.

विवेकने राम गोपाल वर्मा यांचा सिनेमा कंपनीमधून सिनेमाक्षेत्रात पदार्पण केले. या सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पण तसेच सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्याने रोड आणि दम या ऍक्शन सिनेमांमध्ये काम केले.

पुढे 2002 मध्ये, त्याने शाद अली दिग्दर्शित साथिया या सिनेमामध्ये काम केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणीमध्ये फिल्मफेअरचे नामांकन मिळाले. या सिनेमातील त्याची आणि राणीची जोडी मुख्यतः विवेकच काम सगळ्यांना आवडलं होतं.  2004 मध्ये, त्याने कॉमेडी  सिनेमा मस्ती आणि पॉलिटिकल थ्रिलरमध्ये युवा या चित्रपटात  काम केले. 2005 मध्ये, त्याने किसना: द वॉरियर पोएटमध्ये मुख्य पात्र साकारले होते .

2006 मध्ये, शेक्सपियरच्या ऑथेल्लो या नाटकाचे हिंदी रूपांतर केलेला सिनेमा ओंकारामध्ये दिसला.  मूळ नाटकातील मायकेल कॅसिओ या पात्रावर आधारित केसू ही भूमिका विवेकने साकारली आहे. या सिनेमातील विवेकचं काम बघितल्यावर ज्येष्ठ गीतकार  गुलजार यांनी त्यांचे अभिनंदन केले होते.

2007 मध्ये, त्याने शूटआउट ऍट लोखंडवालामध्ये गँगस्टर माया डोलासची भूमिका केली होती. 2008 मध्ये, विवेकने अपूर्व लखिया दिग्दर्शित आणि एकता कपूर निर्मित मिशन इस्तंबूलमध्ये काम केले.

2009 मध्ये विवेकने कुर्बान चित्रपटात सहाय्यक भूमिका केली होती. 2010 मध्ये, तो प्रिन्स या चित्रपटात  दिसला, ज्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्याच वर्षी, तो राम गोपाल वर्मा यांच्या रक्त चरित्र  मध्ये तेलुगु राजकारणी परितला रवीची भूमिका साकारताना दिसला होता. विवेक ओबेरॉयचा चित्रपट किस्मत लव पैसा दिल्ली, जो ऑक्टोबर 2012 मध्ये प्रदर्शित झाला, प्रेक्षकांना प्रभावित करण्यात अपयशी ठरला आणि बॉक्स ऑफिसवरही  अपयशी ठरला.

विवेकने 2011 मध्ये देख इंडियन सर्कस नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट १६व्या बुसान चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला होता, जगभरातील 3000 चित्रपटांमधून आणि प्रदर्शित झालेल्या 380 चित्रपटांपैकी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा प्रेक्षक निवड पुरस्कार या चित्रपटाने जिंकला. बुसानच्या १६ वर्षांच्या इतिहासात  पुरस्कार जिंकणारा हा पहिला भारतीय चित्रपट आहे. विवेकने द अमेझिंग स्पायडर-मॅन 2 च्या हिंदी-डब आवृत्तीमध्ये इलेक्ट्रोचा आवाज डब केला आहे, हा चित्रपट भारतात  मे 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता.

Leave a Comment