Video: गौतमी पाटीला टक्कर देती ‘ही’ तरुणी; व्हिडीओ झाला व्हायरल…

सध्या सोशल मीडियावर इस्टांस्टार आणि लावणी कलाकार गौतमी पाटील  ही लोकप्रिय बनली आहे. तिच्या लावणी कार्यक्रमांना लोक तुफान गर्दी करत असतात. तिचे लावणी शो कायम चर्चेत असतात.(Video of Sandhya Patil who competes with Gautami goes viral)

गौतमीचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल केले जातात. तिच्या लावणी कार्यक्रमांना लोक तुफान गर्दी करत असतात. महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटील हीच्या लावणीवर बंदी घालावी म्हणून मागणी सुद्धा करण्यात आली होती.

मात्र आता संध्या पाटील गौतमीला टक्कर देताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर संध्या पाटीलची जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर संध्या पाटीलचा एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

‘खुळखुळा’ गाण्यावरील हा संध्या पाटीलचा हा व्हिडीओ आहे. गौतमीला टक्कर द्यायला संध्या आली असल्याच्या नेटकरी म्हणत आहेत. मात्र तिला गौतमी इतकी लोकप्रियता मिळालेली नाही.  अशातच त्यांची जुगलबंदी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

दरम्यान अश्लील लावणी डान्स केल्यामुळे गौतमी पाटील चर्चेत आली होती. मात्र तिने यासाठी माफी देखील मागितली आहे.

Leave a Comment