Video: अभिनय सोडून ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री गावात करतेय असे काम? अवस्था पाहताच चाहते थक्क…

टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री रतन राजपूत. या अभिनेत्रीने एकेकाळी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. ही अभिनेत्री संतोषी माँ या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. मात्र सध्या तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये ही अभिनेत्री गावातील शेतामध्ये काम करत असताना दिसत आहे. रतनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहताच चाहते हैराण झाले आहेत. चाहत्यांना ही अभिनेत्री अभिनय सोडून गावामध्ये का भटकत आहे असा प्रश्न पडला आहे.

टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून रतन राजपूतला ओळखले जाते. रतन नेहमीच ग्लॅमरच्या जगापासून दूर असते. तिला साधं राहायला आवडतं. आपण तिला बहुतेकदा मेकअपशिवाय देखील पाहिलं आहे.

रतनला सुद्धा तिचं गाव खूप आवडतं आणि तिला हवं तेव्हा ती तिच्या गावी जाते. अभिनेत्रीच्या गावाची झलक तिच्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल. आता रतनच्या नवीन व्लॉगमध्ये ती बिहारमधील एका गावाच्या दौऱ्यावर गेली असल्याचे दिसत आहे.

नुकताच अभिनेत्री रतन राजपूतच्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, ती बिहारमधील आवाडी गावात गेली आहे. गावाच्या वाटेवर सती मातेचे मंदिर असून तेथे रतनने भेट दिली आहे.

तसेच रतनने सांगितलं की, ती महाराष्ट्रातील एका गावात राहते. तिने गावात कांदे आणि हळद या पिकाची लागवड केली आहे. यासोबतच रतनने असं देखील सांगितलं की, तिला गावातील जीवन जगण्यात मजा येते. त्यामुळे गावातील जीवन जगण्यासाठी रतनने शेती केली आहे.

अभिनेत्रीच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचे झाले तर, रतन ‘संतोषी माँ सुनिये व्रत कथाएं’ या मालिकेत ती शेवटची दिसली होती. ही मालिका 2020 मध्ये प्रसारित झाली होती, मात्र आता ही मालिका बंद झाली आहे.

या मालिकेनंतर रतन पडद्यावर दिसली नाही. त्यामुळे रतन आता इंडस्ट्री सोडणार असल्याच्या देखील चर्चा चालू आहेत. मात्र, ती आता यूट्यूबर बनली आहे आणि यूट्यूब व्हिडीओजच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहत असते.

Leave a Comment