आपल्या प्रत्येक GF ला मंदिरामध्ये नेऊन ‘हे’ काम करायचा अक्षय कूम, शिल्पाने केला धक्कादायक खुलासा

हिंदी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि फिट अभिनेत्री शिल्पा शेट्टी ४५ वर्षांची झाली आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ती केवळ अभिनेत्रीच नाही तर एक मॉडेल, फिटनेस ट्रेनर, योगा गुरु आणि बिझनेसवूमन देखील आहे. तिने बाजीगर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

एके काळी शिल्पा शेट्टीचे नाव अभिनेता अक्षय कुमार सोबत जोडले गेले होत. त्या दोघांचे अफेअर होते या देखील चर्चा रंगल्या होत्या. त्यांनी अनेक एकत्रित चित्रपट केले. इन्साफ, धडकन, मै खिलाडी तू अनारी यांसारख्या चित्रपटांमधून त्यांच्यातील जवळीकता वाढली. तेव्हा अक्षय ट्वीनकल खन्नाला देखील डेट करत होता. एका मुलाखतीमध्ये शिल्पा शेट्टीने अक्षयसोबत असलेल्या रिलेशनशिपचा खुलासा केला होता.

शिल्पा शेट्टीने २० वर्षांपूर्वी सांगितले होते की, जेव्हा अक्षय कुमारसोबत ती रिलेशनमध्ये होती तेव्हा अक्षयकडे दोन वेळा असायच्या. एक वेळ तो तिच्यासोबत असायचा तर दुसरा वेळ तो      ट्वीनकलसोबत असायचा.

अशाप्रकाराने मनवयाचा गर्लफ्रेंडला 

शिल्पा शेट्टीने अक्षय बद्दल सांगितले की, प्रत्येक गर्लफ्रेंडला अक्षय एका खास प्रकारे मनवायचा मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये तो रात्री उशिरा  आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन जात असे आणि लग्न करण्याचे वचन देत असे. जेव्हा एखादी नवीन मुलगी त्याच्या आयुष्यात आली की तो ते वचन तोडायचा.

बिघडले होते मानसिक संतुलन

शिल्पाने सांगितले की, जेव्हा तिचे आणि अक्षय कुमारचे ब्रेकअप झाले तेव्हा ती आपले मानसिक संतुलन गमवून बसली होती. अक्षयवर तिचे खूप  प्रेम होते, खूप विश्वास होता. परंतु, त्याने तिचा विश्वास मोडला. तिच्या आईवडिलांनी तीला यातून सावरण्यास मदत केली.

राज कुंद्रासोबत केले लग्न

शिल्पाने सगळा भूतकाळ  विसरून २००९ मध्ये राज कुंद्रासोबत लग्नगाठ बांधली. तिने  २१ मे २०१२ साली मुलगा वियानला जन्म दिला . गेल्या २५ फेब्रुवारी रोजी सरोगेसीद्वारे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घरामध्ये मुलगी समीशा शेट्टीचे आगमन झाले.

अनेक वेळा झाले मिसकॅरेज 

शिल्पाने सांगितले की,  जेव्हा वियानचा जन्म झाला तेव्हा ते दुसऱ्या मुलासाठी तरी करत होते. तिला एपीएलए नावाचा आजार होता. ती प्रेग्नन्ट व्हायची तेव्हा हा आजार सक्रिय व्हायचा. त्यामुळे ती खूप वैतागली होती. अखेर सरोगेसीद्वारे त्यांना मुलगी झाली.

Leave a Comment