खाली पहा दिग्गज अभिनेते ‘निळू फुले’ यांचे कधी न पाहिलेले फोटो…

मराठी रंगभुमी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलावंत निळु फुले! दोन ही क्षेत्रामध्ये निळु फुलंेनी आपला वेगळा असा ठसा उमटवला आहे. नायक,

खलनायक, चरित्र अभिनेता, या प्रकारच्या भुमिका त्यांनी केल्या असल्या तरी देखील ’खलनायक’ म्हणुन ते ठळकपणे आपल्या लक्षात राहातात. त्यांनी साकारलेला ’खलनायक ’ एवढा जिवंत वाटायचा की स्त्री वर्ग तर अक्षरशः त्यांच्या नावाने बोटं मोडायचा.

राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकामधुन निळु भाऊंचा अभिनयाला नवे कोंदण लाभले. ’कथा अकलेच्या कांद्याची’ या लोकनाटयातुन त्यांचे अभिनय क्षेत्रात पदार्पण झाले. त्यानंतर ’पुढारी पाहिजे’ ’बिन बियांचे झाड’ या लोकनाटयांमधनं त्यांच्या अभिनयाला नवे कंगोरे लाभले.

सिंहासन, पिंजरा, एक गांव बारा भानगडी, सामना, अजब तुझे सरकार, शापित या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले.

सखाराम बाईंडर या विजय तेंडुलकरांच्या नाटकातील त्यांचा अभिनय एवढया जबरदस्त ताकदीचा होता की त्याला तोड नाही.

पुढे बेबी, रण दोघांचे, पुढारी पाहिजे, राजकारण गेलं चुलीत, सुर्यास्त, प्रेमाची गोष्ट या निळु भाऊंच्या नाटकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.

त्यांच्या सुर्यास्त या नाटकाकरीता त्यांना नाटयदर्पण अकादमीचा पुरस्कार देखील मिळाला आहे.

निळु फलेंना वाचनाची प्रचंड आवड होती. एकदा पुस्तक हातात घेतले की ते त्याच दिवशी संपवायचे असा त्यांचा हट्ट असायचा. वाचनाच्या आवडीमुळेच त्यांच्यातील कलावंतामधे अभिनयाची ही प्रगल्भता आणि सहजता आली असावी.

मराठी चित्रपटसृष्टीतला खलनायक म्हणुन आपल्या डोळयासमोर पहिले आणि शेवटचे नाव येते ते निळु फुले यांचेच. त्यांच्या खलनायकी भुमिकेचा मराठी प्रेक्षकांवर एवढा प्रभाव का पडला ? हा एक प्रश्नच आहे.

त्यांच्या नंतर मराठी चित्रपटसृष्टीत खलनायक कुणी आलं नाही असं नाही. कुलदीप पवार, दिपक शिर्के, राहुल सोलापुरकर, अशी कितीतरी नावे सांगता येतील देखील! परंतु अभिनयाची जी उंची निळु फुले यांना गाठता आली तिथवर कुणीही पोहोचु शकले नाही हे निर्वीवाद सत्य आपल्याला मान्य करावेच लागेल. मराठी सिनेसृष्टीतील खलनायकाची पोकळी ख.या अर्थाने निळु फुलेंनी भरून काढली.

त्यांच्यातला खलनायक जनमानसात एवढा खोलवर रूजला होता की सहज म्हणुन देखील ते एखाद्या गावात गेले तरी आया.बाया त्यांच्या नावाने बोटं मोडीत असत.

Leave a Comment