बापरे!!! तुझ्यात जीव रंगला मालिकेमधी या अभिनेत्रीचा झाला अपघातामध्ये जागीच मृत्यू…

तुझ्यात जीव रंगला(Tujhyat Jeev Rangla) ही छोट्या पाड्यावरील प्रसिद्ध मालिकांपैकी एक आहे. या मालिकेमधील सर्व कलाकार खूप प्रसिद्ध आहेत. परंतु या मालिकेमधील फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव हीचा एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये या अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला आहे. (Tujhyat Jeev Rangla serial actress kalyani kurale jadhav died on the spot in an accident)

कोल्हापूर सांगली महामार्गावर एका डंपरने अभिनेत्रीला धडक दिली आणि या अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला आहे. मात्र ही अभिनेत्री खूप लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. परंतु या अभिनेत्रींच्या मृत्यूच्या बातमीनंतर मराठी इंडस्ट्रीमध्ये शोकाळ पसरला होता.

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री कल्याणीने  सांगली महामार्गावर हालोंडी फाट्याजवळ एक हॉटेल चालू केले होते. तर या अभिनेत्रीने तिच्या हॉटेलचे नाव प्रेमाची भाकरी असे ठेवले होते. मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा ही अभिनेत्री हॉटेल बंद करून घरी परतत होती तेव्हा तिला एका वेगाने येणाऱ्या डंपरने धडक दिली होती. त्याच वेळी या अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे.

एका आठवड्या आधीच या अभिनेत्रीने तिच्या  इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. ज्यामध्ये तिने तिचा वाढदिवस कसा साजरा केला ते सांगितलं आहे. पोस्टमध्ये तिने लिहले होते कि, “काल माझा वाढदिवस मी लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला. मला खूप आनंद झाला मी माझा वाढदिवस साजरा करण्या साठी कुठे बाहेर गेले नाही ना पार्टी केली. मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली हे फक्त स्वामींनी माझ्या कडून करून घेतले आहे. असेच प्रत्येक वाढदिवसाला होऊदे.  स्वामी मला तुमचे आशीर्वाद तर आहेतच असेच आशीर्वाद नेहमी असुदेत. मला हे सगळ करण्यासाठी शक्ती द्या.”

या अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने एक वेगळीच ओळख चित्रपट विश्वामध्ये निर्माण केली आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे या अभिनेत्रीला जास्त प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेमध्ये अभिनेत्री सहाय्यक भूमिकेमध्ये सगळ्यांसमोर आली होती.

या मालिकेमुळे कल्याणी घरो घरी पोहचली होती. या मालिकानानंतर कल्याणीने दक्खनचा राज ज्योतिबा या मालिकेमध्ये सुद्धा भूमिका साकारली आहे. या मालिकेमधील तिचे पात्र देखील खूप प्रसिद्ध झालं होत.

कोल्हापूर हे या अभिनेत्रींचे मूळ गाव आहे.  कोल्हापूरमधील  महावीर कॉलेजच्या परिसरामध्ये कल्याणी राहत होती. तसेच सोशल मिडियाद्वारे  ही अभिनेत्री तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत होती. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सतत शेअर करत होती.

 

Leave a Comment