खाली पहा I.A.S. तुकाराम मुंडे यांचे कुटुंबासोबत कधी न पाहिलेले फोटो…

तुकाराम मुंढे हे नाव महाराष्ट्रात परिचयाचं नाही अशी व्यक्ती मिळणं फार कठीण आहे. आपल्या शिस्तबद्द स्वभाव आणि कडक शिस्तीमुळे तुकाराम मुंढे नेहमीच चर्चेत असतात.

सोबतच स्थानिक प्रशासनासोबत त्यांचे होणारे वाद-मतभेद तसंच वारंवार होणारी बदली यामुळे त्याचं नाव प्रसारमाध्यमांमध्येही नेहमी असतं. आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट घेतले आहेत.

एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तुकाराम मुंढे यांनी फार हाल अपेष्ट सहन करत यशाची उंची गाठली आहे. आज आपण त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. एका मुलाखतीत त्यांनी याचा उलगडा केला होता.

तुकाराम मुंढे हे मूळचे बीड जिल्ह्यातील ताडसून्न या गावचे आहेत. गावाची लोकसंख्या सर्वसाधारणपणे पाच हजाराच्या आसपास आहे. हे गाव १०० टक्के शेतीवर निर्भर असून कोरडी जमीन असल्याने फार मेहनत घ्यावी लागते.

तुकाराम मुंढे यांचं बालपण गावातच गेलं आहे. गावात सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करायची, त्यानंतर आठवडा बाजारात जाऊन भाजी विकायची. त्यानंतर आठवड्याभराचा संसार आणि दोन वेळचं जेवण आपल्याला भेटेल अशा दृष्टीने प्रयत्न करायचे अशी गावची परिस्थती होती

तुकाराम मुंढे यांचं गावातच १० वीपर्यंत शिक्षण झालं. जिल्हापरिषद शाळेत शिक्षण घेत असताना तिथली शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याच परिस्थितीत शिक्षण घेतलं.

तुकाराम मुंढे यांनी नवव्या, १० व्या वर्षी शेती करायला सुरुवात केली. कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी यासाठी त्यांनी चौथीत शिकत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत शेतीचं काम सुरु केलं होतं.

तुकाराम मुंढे यांचे वडीलबंधू बीडला शिक्षण घेत होते. महिन्याला १०० ते २०० रुपये पाठवण्यासाठी त्यांना कसरत करावी लागत होती आणि शेतीतून उत्पन्न कमी मिळत होतं.

तुकाराम मुंढे यांनी पहिला सिनेमा दहावीनंतर पाहिला होता. त्यामुळे गावातून थेट औरंगाबादसारख्या शहरात येणं त्यांच्यासाठी खूप मोठा सांस्कृतिक धक्का होता.

 

Leave a Comment