३२ वर्षांपासून रेखासोबत सावलीसारखी राहणारी ‘ही’ महिला आहे तरी कोण? जाणून तुम्हीही व्हाल अवाक्…

बॉलिवूडमधील ज्येष्ठ आणि सौंदर्यवान अभिनेत्री रेखा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तीने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. उ

त्तम अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिच्या सौंदर्याने तिने चाहत्यांना घायाळ केले आहे. रेखाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात साऊथ चित्रपट रंगूला रत्नम मधून केली होती.

तिने या चित्रपटामध्ये बालकलाकाराची भूमिका केली होती. रेखा कोणाच्या नावाचे सिंदूर लावते हे जाणून घेण्याची लोकांना नेहमीच उत्सुकता असते. रेखाची सेक्रेटरी फर्जानामुळे देखील लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित राहत असतात.

रेखा आणि सेक्रेटरी फर्जाना या दोघींमध्ये कोणते नाते आहे हे जाणून घेण्यासाठी लोक नेहमीच उत्सुक असतात.

तुम्ही रेखासोबत कायम एका महिलेला पाहिले असेल. तिला रेखाची सावली म्हटले जाते. या महिलेचे नाव फर्जाना असे आहे. ती गेली ३२ वर्षांपासून रेखासोबत आहे.

रेखाची सेक्रेटरी फर्जाना बाबतीत मोहंद्वीप पत्रकारानं त्याच्या पुस्तकामध्ये खास लिहून ठेवले आहे. या पुस्तकानुसार रेखा आणि फर्जानाचे खूप जवळचे नाते आहे.

फर्जाना नेहमीच एखाद्या पुरुषांसारखे कपडे वापरत असते. पत्रकार मोहंद्वीपने त्यांच्या पुस्तकामध्ये रेखाच्या बेडरूमबद्दल देखील अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत.

त्यांनी लिहिले आहे की रेखाच्या बेडरूममध्ये कोणालाही जाण्याची परवानगी नाही. फक्त फर्जानाला त्यांच्या रूममध्ये येण्याजाण्याची सूट आहे.

पत्रकार मालविका संघवीने देखील म्हटले होते की रेखा फर्जानाशिवाय राहू शकत नाही. फर्जानाला माहित आहे की रेखाला कोणत्या गोष्टींपासून त्रास आहे. रेखा तिच्या सेक्रेटरी फर्जानाला आपली बहीण मानते असे बोलण्यात येते.

Leave a Comment