ती परत आलीय मालिका फेम, अभिनेत्याने गुपचूप उरकले लग्न, पहा वायरल फोटो..

मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये अनेक प्रसिद्ध कलाकार लग्न करत आहेत. नुकतंच प्रसिद्ध अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर लग्न बंधनात अडकले आहेत. याचदरम्यान आणखीन एक मराठी अभिनेत्याने लग्न केलं आहे. (Marathi Actor Nachiket Devsthali got married)

छोट्या पडद्यावरील अभिनेता नचिकेत देवस्थळी या अभित्याचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. त्याने अभिनेत्री तन्वी कुलकर्णी सोबत लग्न गाठ बांधली आहे. तर  सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नातले फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

ती परत आलीये या मालिकेमध्ये नचिकेतने मुख्य भूमिका साकारली होती. ही मालिका झी मराठी वाहिनी प्रसारित होत होती. तसेच या मालिकेमुळे हा अभिनेता घरो घरो पोहचला आहे. नचिकेतने साकारलेली भूमिका खूप गाजली होती.

नचिकेत आणि तन्वी यांचे लग्न २९ नोव्हेंबरला धुमधडाक्यात संपन्न झाले आहे. या दोघांच्या लग्न सोहळ्यामध्ये अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचसोबत अनेक कलाकारांनी या दोघांचे  फोटो सोशल मीडिया पोस्ट करत अभिनंद केले आहे.

पारंपरिक पद्धतीने नचिकेत आणि तन्वीने त्यांचे लग्न पार पडले आहे. पिवळ्या रंगाची नऊवारी साडी तन्वीने लग्नामध्ये नेसली  होती. त्यानंतर तिने रिसेप्शनसाठी निळ्या रंगाची साडी नेसली होती. तर दुसरीकडे नचिकेतने लग्नसाठी शेरवानी घातली होती. हे जोडपं त्यांच्या लग्नामध्ये  अतिशय सुंदर दिसत होत.

सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या फोटोवर अनेक चाहते लाइक आणि कमेंट करत आहेत. सर्वांकडून नचिकेत आणि तन्वी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment