मराठी अभिनेता शरद केळकर याची पत्नी आहे प्रसिद्ध ही अभिनेत्री; दिसते खूप बोल्ड आणि हॉट, फोटो पाहून व्हाल तुम्हीही थक्क…

अभिनेता शरद केळकर याने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केल आहे. त्यांचे उत्कृष्ठ अभिनयाच्या जोरावर त्यानी त्याचा खूप मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. तसेच त्याच्या अनेक भूमिका खूप लोकप्रिय झाल्या होत्या. (This famous actress is the wife of Marathi actor Sharad Kelkar)

नुकतंच शरदच्या तान्हाजी- द अनसंग वॉरियर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये शरदने अजय देवगन, सैफ अली खान, काजोल अश्या प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केलं आहे. या चित्रपटामध्ये शरदने छत्रपती शिवाजी महाराज्यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला आणि शरदच्या भूमिकेला अनेकांनी प्रेम दिल होत.

नुकताच अभिनेता शरद केळकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शरद पत्रकारांसोबत बोलताना दिसत आहे. त्यावेळी त्याला एका महिला पत्रकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून प्रश्न विचारला होता. तेव्हा प्रश्न दुरुस्त करत, शिवाजी नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणा असे  शरद महिलेला म्हणाला आहे.

त्या व्हिडिओमध्ये शरद केळकरने महिलेची चूक सुधारली. परंतु त्याच्या महाराजांबद्दलचा आदर आणि प्रेम यातून दिसून आले.  शरद २००५ साली लग्न बंधनात अडकला आहे.  कीर्ती गायकवाड असे त्याच्या पत्नीची नाव आहे.

टीव्हीवरील प्रसिद्ध आणि लोकप्रिय चेहरा म्हणून किर्तीला सर्वत्र ओळखलं जाते. सात फेरे या मालिकेमध्ये किर्ती आणि शरद यांनी एकत्र काम केलं आहे. त्याचवेळी हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्या प्रेमाचे त्यांनी पुढे जाऊन लग्नात रूपांतर केले.

तर या जोडप्याला एक मुलगी देखील आहे. त्या गोंडस मुलीचे नाव किशा असे आहे. कीर्ती अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. छोटी बहू, ससुराल सिमर का, साथ फेरे अश्या मालिकांमध्ये ती झळकली होती. नच बलीये या रियालिटी शोमध्ये सुद्धा कीर्ती तिच्या चाहत्यांना दिसली होती.

तर हे खुप कमी लोकाना माहिती असेल कि, अभिनय क्षेत्रामध्ये काम करण्यापूर्वी शरद केळकर जिम ट्रेनर म्हणून काम करत होता. ग्वाल्हेर मध्ये शरदने त्याचे  सुरुवातीचे शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर शरदने एमबीएची पदवी इंदूरच्या प्रिस्टेज कॉलेजमधून घेतली. यानंतर फिजिकल एज्युकेशनच्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय शरदने घेतला होता. त्यासाठी शरद मुंबई मध्ये एका टेलिकॉम कंपनीत पार्ट टाइम जॉब करू लागला होता.

याचसोबत तो एक जिमट्रेनर म्हणून काम देखील करत होता. हे सगळं करत असताना शरद मॉडेलिंग सुद्धा करत होता. तर शरदने छोट्या पडद्यापासून त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. आक्रोश या दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या मालिकेमधून त्याने मनोरंजन क्षेत्रामध्ये पदार्पण केलं होत. त्यानंतर त्यानेक अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं होत.

शरदने हलचल, रामलीला, इरादा, मोहनजोदारो, रॉकी हँडसम, इरादा अश्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या सर्व चित्रपटांमध्ये शरदने त्यांच्या उत्तम अभिनयाची छाप सोडली आहे. तसेच शरदने बाहुबली चित्रपटाच्या हिंदी डबमध्ये प्रभासला त्याचा आवाज दिला आहे. डबिंग आर्टिस्टसुद्धा शरदची ओळख आहे.

Leave a Comment