८ वर्षात एवढी बदलली आहे टीव्हीवरील ‘ही’ छोटी कृष्णा, आता ओळखणं झालंय कठीण…

असे अनेक बालकलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. या बाल कलाकारांनी त्यांच्या निरागसतेमुळे सर्वाना भुरळ घातली. बडे अच्छे लगते है या मालिकेतील पिहू तुम्हाला नक्कीच आठवत असेल. छोट्या, क्युट पिहूने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

अशीच आणखी एक छोटी मुलगी होती जिने आपल्या अभिनयनाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. कलर्स वाहिनीवरील ‘जय श्री कृष्णा’ या मालिकेमध्ये एक छोटी मुलगी कृष्णाजींची भुमीका करायची. त्या मुलीकडे पाहून वाटायचे कि खरच कृष्णाचे बालपण आहे. ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. यातील प्रत्येक कलाकाराचे प्रेक्षकांनी खुप कौतुक केले.

आज आपण जाणून घेऊयात त्याच मुलीबद्दल जिने श्रीकृष्णाजींची भूमिका साकारली होती. कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या मुलीचे नाव आहे धृती भाटिया. या मालिकेमुळे धृती खूप लोकप्रिय झाली होती. यानंतर मात्र ती टीव्ही वर फार कमी दिसली. परंतु आज आम्ही तुम्हाला धृतीचे काही खास फोटो दाखवणार आहोत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर, गोंडस दिसत आहे.

जय श्री कृष्ण या मालिकेव्यतिरिक्त तिने बऱ्याच मालिकांमध्ये काम केले. परंतु कृष्णाच्या रूपाने तिला जे प्रेम आणि ओळख दिली ते इतर मालिकांमधून काही खास मिळू शकले नाही. तीने इस प्यार को क्या नाम दु आणि माता कि चौकी या मालिकांमध्ये झळकली होती. तीने अनेक जाहिराती देखील केल्या. एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, जय श्री कृष्णा मधील भूमिका आणि त्या कार्यक्रमाला कधीच विसरू शकत नाही.

तिला जाणवते की या सिरिअलमुळे तिला खूप आदर मिळत असत. युनिटमधील सर्व लोकांनी तिला कन्हैयाच्या नावाने हाक मारण्यास सुरुवात केलेली.

आता धृती मोठी झाली असून ती सध्या तिचा अभ्यास पूर्ण करीत आहे. धृतीच्या नव्या फोटोंमधील तिला ओळखणे खुप कठीण आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यावर ती सतत तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. तिने नवीन फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

धृतीमध्ये इतका बदल झाला आहे कि तिला आता ओळखूच शकत नाही. एका कार्यक्रमात तिला विचारले कि तुला कोणती गोष्ट विकत घ्यायला आवडेल तेव्हा तिने लाल रंगाचं बीएमडब्लू फार आवडते. मी खूप मोठी झाली की स्वतःच्या पैशाने बीएमडब्लू कार विकत घेईल असे सांगितले.

श्री कृष्णावर तिची खूप आस्था आहे. तिला वेळ मिळेल तशी ती इस्कॉन मंदिरात जाते. तेथे गेल्यावर तिला मनशांती मिळते आणि फ्रेश वाटते. अभ्यास पूर्ण झाल्यावर तिला कोरिओग्राफर आणि गायिका व्हायचे आहे.

Leave a Comment