अहमदनगरच्या ‘या’ कलाकारने केलं 300 हुन अधिक चित्रपटात केलं काम; अखेर झाला दुःखद अंत…

बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक उत्तम खलनायक झाले. अनेक कळकरांनी उत्तम अभिनयाने  खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनं जिंकले होते. यात प्राण, अमरीश पुरी, अमजद खान, डॅनी डेंगझोंगपा, प्रेम चोप्रा, रणजीत, गुलशन ग्रोवर, मुकेश ऋषी, रझा मुराद, कुलभूषण खरबंदा या कलाकारांची नाव सामील आहेत.
सदाशिव अमरापूरकर (sadashiv amrapurkar) यांचं देखील या यादीत नाव आहे.(This  actor from Ahmednagar has acted in more than 300 films; But it did not gain popularity; Finally there was a sad ending)

बदमाश इन्स्पेक्टर गोडबोले उर्फ सदाशिव अमरापूरकर यांना सगळेच ओळखतात. त्याकाळी खलनायकाची इतकी क्रेझ होती कि खलनायकाशिवाय चित्रपट अपूर्ण वाटत होते. प्रसिद्ध खलनायकापैके एक नाव सदाशिव अमरापूरकर यांचे होते. त्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होते.

जेव्हा केव्हा प्रेक्षक त्यांचे साकारलेले पात्र चित्रपटाच्या पडद्यावर पाहून त्यांच्या बद्दल वेगळी प्रतिक्रिया देत होते. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांचे नाव मोठ्या अभिनेत्याच्या यादीत जोडले गेले आहे. प्रेक्षकांच्या म्हण्यानुसार ते त्यांनी साकारलेले सगळे पात्र ते जगत असतात.  त्यांच्या साकारलेल्या पात्राला लोक वाईट बोलत होते मात्र त्यांच्या अभिनयाचे कौतुक देखील करत होते.

काला नाग म्हणून सदाशीव यांना ओळखलं जात होत. काला नाग नावाच्या खलनायकाची भूमिका त्यांनी एका चित्रपटामध्ये साकारली होती. त्यांनतर याच नावाने सगळे त्यांना ओळखू लागले होते.  सदाशिव यांचा जन्म व्यापारी कुटुंबात झाला होता. परंतु त्यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवले होते.

सदाशिव यांना अभिनयाच्या आवडीसोबत  क्रिकेटची देखील खूप आवड होती. ‘रणजी ट्रॉफी’मध्ये सदाशिव यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते.

हिंदी चित्रपटसृष्टीतील  अनेक चित्रपट गाजवणारे सदाशिव २०१३ साली अखेरचे त्यांच्या चाहत्यांना दिसले होते.  त्यांचा ‘बॉम्बे टॉकीज’ हा अखेरचा चित्रपट प्रकशित झाला होता.  त्यांना फुफ्फुसात संसर्ग झाल्यामुळे त्यांना धीरूभाई अंबानी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले होते. ३ नोव्हेंबर २०१४ रोजी सदाशिव अमरापूरकर यांनी  वयाच्या ६४ व्या वर्षी  जगाचा निरोप घेतला.

Leave a Comment