सलमान खानवर कोसळला दुःखाचा डोंगर, ज्यांनी केले त्याला सुपरस्टार, त्यांना…

बॉलिवूड मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध निर्माते नितीन मनमोहन यांना हृदविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (The producer Nitin Manmohan suffered a heart attack)

बॉलिवूड निर्माते नितीन मनमोहन यांना हृदविकाराचा झटक्यामुळे तातडीने रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहे. परंतु त्यांची प्रकृती खूप गंभीर असल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.  कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयामध्ये त्यांना ४ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले आहे. त्याच दिवशी त्यांना हृदविकाराचा झटका आला होता.

निर्माते नितीन मनमोहन यांची प्रकृती खुप गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे. मात्र  औषधांमुळे त्यांच्या तब्येती थोडा फरक जाणवला आहे. परंतु त्यांची परिस्थिती अजून नाजूकच असल्याचे समजलं आहे.

बॉलिवूड लोकप्रिय अभिनेते मनमोहन हे नितीन यांचे वडील आहेत.  ‘ब्रह्मचारी’, ‘गुमनाम’ आणि ‘नया जमाना’ अशे अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. तसेच बोल राधा बोल’, ‘लाडला’, ‘चल मेरे भाई’ ‘रेडी’ आणि  ‘दस’ या चित्रपटांसाठी नितीन मनमोहन यांना ओळखले जाते.  निर्मातीसोबत नितिन उत्कृष्ठ अभिनय करतात.

शहीद या चित्रपटामध्ये चंद्रशेखर आझाद यांची भूमिका नितीन यांनी साकारली होती. एक अभिनेता म्हणून त्यांचा हा शेवटचा चित्रपट होता. परंतु त्यांना अचानक हृदविकाराचा झटका आला आहे. त्यामुळे त्यांची परिस्थिती खूप गंभीर आहे.

रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर नितीन यांना अभिनेता अक्षय खन्ना भेटीला गेला असल्याचे समजलं आहे.

Leave a Comment