धक्कादायक!! ३ इडिस्ट्स फेम प्रसिद्ध अभिनेत्याचे झाले निधन; चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा…

बॉलिवूडमध्ये एका पाटोपात एक दुखत बातम्या समोर येत आहेत. मनोरंजन क्षेत्राला आणखीन एका कलाकाराच्या निधनाचा धक्का बसला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रामध्ये शोकाळा पसरली आहे.(3 Idiots Famous Actor Dies; Find out who it is)

टीव्ही मालिकांमध्ये आणि अनेक चित्रपटांमधून अनेकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते अरुण बाली(Arun Bali ) यांचा आज मुत्यू झाला आहे.  अरुण बाली यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले आहे.  मुंबई येथे त्यांनी या जगाचा शेवटचा निरोप घेतला.

मीडियाने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी ४:३० च्या सुमारास अरुण बाली यांचं निधन झाले आहे.  अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये बाली यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली होती. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

माहिती मिळाली होती कि अनेक दिवसांपासून अरुण बाली गंभीर स्वरूपात आजारी होते. त्यामुळे ते काही दिवसापासून रुग्णालयात होते. त्यांना मायस्थेनिया ग्रॅव्हिस(Myasthenia Gravis) हा आजार झाला होता. या आजाराला ते गेल्या काही दिवसापासून मात देण्याचा पर्यंत करत होते. मात्र त्यांच्या या पर्यांतना  यश मिळालं नाही. अखेर त्यांनी निधन झाले.

बाली यांच्या निधनानंतर टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये दुखी वातावरण निर्माण आहे. त्यांचे चाहते आणि बाकी इतर कलाकार त्यांना सोशल मीडियावर शोक व्यक्त करताना दिसत आहेत. त्यांचे चाहते त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करताना दिसत आहेत.

९०च्या दशकात बाली यांनी त्यांच्या अभिनयाला सुरवात केली होती.  ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘खलनायक’, ‘जब वी मेट’, ‘फूल और अंगारे’, ‘केदारनाथ’ अश्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप पडली होती.

त्यांच्या प्रत्येक साकारलेल्या पात्राची त्यांचे वेगळी ओळख निर्माण केली होती. चित्रपट सोडले तर त्यांनी अनेक मालिकांमध्ये देखील काम केलं होते. त्यात ‘बाबुल की दुआं लेती जा’, ‘कुमकुम’ सारख्या अनेक मालिकेचा सामावेश आहे.

Leave a Comment