आई कुठे काय करते मालिकांमधील या अभिनेत्रीची प्रकृती झाली गंभीर?

छोट्या पाड्यावर अनेक मलिक चालू आहेत. परंतु काही मालिका अश्या आहेत ज्या खूप प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यात आपण आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचं नाव देखील घेऊ शकतो. या  मलिकने अनेकांना वेड लावले आहे. तसेच या मालिकेमधील पात्र खूप लोकप्रिय झाले आहेत. (The condition of Rupali Bhosle, an actress from the serials Aai Kuthe Kay Karte, has become critical)

या मालिकेमध्ये मुख्य नायिका अरुंधती या मालिकेमुळे घरोघरी पोहचली आहे. तसेच अरुंधतीचे पात्र अभिनेत्री मधुराणी प्रभूलकरने साकारले आहे. या अभिनेत्रीने या पत्रामुळे अनेकांची मन जिंकली आहेत. ही अभिनेत्री सतत सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांनाच्या संपर्कात राहत असते. ती सतत तिच्या चाहत्यांसोबत माहिती शेअर करत असते.

त्याचसोबत या मालिकेमधील संजना देखील खूप प्रसिद्ध झाली आहे. तिच्या अभिनयाने तिने अनेकांनींची मन जिंकली आहेत. संजनाचे पात्र अभिनेत्री  रूपाली भोसलेने (Rupali Bhosale) अतिशय उत्तमरीत्या साकारली आहे. ही अभिनेत्री सुद्धा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. तसेच ती अनेक फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या फोटोजल लाखो मध्ये लाईक मिळत असतात.

आई कुठे काय करते या मालिकेमुळे अभिनेत्री रुपाली भोसले घरोघरो पोहोचली आहे. या मालिकेमुळे रूपालीला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. तर रुपालीने साकारलेल्या संजना या भिमिकेला अनेक पुरस्कार देखील मिळले आहेत. परंतु या अभिनेत्रीबद्दल एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. या अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचे समजत आहे.

याची माहिती स्वतः रुपालीने दिली आहे. एक पोस्ट शेअर करत रुपलीने ही माहिती दिली. त्यावेळी तिने तिचे काही हॉस्पिटलमधले फोटो आणि पोस्ट लिहून शेअर केली. तेव्हा तिने लिहले कि,आयुष्यात काही गोष्टी अप्रत्यक्षपणे घडतात. पण अशा प्रसंगांना हसतमुखाने सामोरे जाणे हा उत्तम उपाय असू शकतो. काल माझी एक छोटीशी शस्त्रक्रिया झाली. पण आता मी ठीक आहे. यातून मी सावरतोय. तुम्ही मला दिलेल्या प्रेम आणि आशीर्वादाबद्दल मी आभारी आहे.

पुढे ती लिहत म्हणाली कि,अनेकदा आपण आपल्या शरीरात होत असलेल्या बदलांकडे दुर्लक्ष करतो. शारीरिक समस्या होईपर्यंत आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. शारीरिक त्रासाला आम्ही फारसे महत्त्व देत नाही. पण मी सर्वांना कळकळीची विनंती करते की, शारीरिक वेदनांकडे दुर्लक्ष करू नका. तसेच स्वतःच्या शरीराला गृहीत धरू नका. असे तीने तिच्या पोस्ट मध्ये लिहले आहे.

रुपालीने डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानले आहेत. ठाण्यातील रुग्णालयामध्ये रुपालीवर उपचार सुरू आहेत. तसेच रुपालीचे चाहते तिला काळजी घेण्याचा सल्ला देत असल्याचे सोशल मीडियावर दिसत आहे.

Leave a Comment