आशिकी फेम अनु अग्रवालला ओळखलं ही झालं आहे कठीण; पाहून सगळे झालेत थक्क…

बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. त्यात काही अशे असतात जे प्रेक्षकांच्या मानत घर करून जातात. आशिकी अश्याच चित्रपटांपैकी एक आहे.  (the condition of Aashiqui fame Anu Aggarwal has become worst)

आशिकी या चित्रपटाने अनेकांना वेड लावले होते. हा चित्रपट १९९० साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये एक मानला स्पर्श करणारी प्रेम कहाणी दाखवली आहे. राहुल रॉय आणि अनु अग्रवाल या दोघांनी या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्यावेळी हे जोडपे खूप  गाजले होते. तसे या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला होता.

काही काळानंतर हे दोनी कलाकार बॉलिवूडपासून दूर गेले होते. या चित्रपटनानंतर राहुल बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ एक चित्रपट फ्लॉप होत असल्यामुळे राहुलने  बॉलिवूडपासून  दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अनु बॉलिवूडमधून दूर जाण्यासाठी तिच्या नशिबाने भाग पडले होते.

अभिनेत्री अनु अग्रवालने आशिकी चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर अनु खूप प्रसिद्ध झाली होती. आशिकी या चित्रपटाने अभिनेत्रीला एका रात्रीत स्टार बनवले होते.  यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागली होत्या.

परंतु नियतीने अनुबद्दल काही वेगळं ठरले होते. एका अपघाताने अनुचे संपूर्ण आयुष्य पालटवले होते. त्यानंतर अनु बॉलिवूड विश्वापासून खूप लांब गेली. परंतु खूप कमी लोकांना माहिती आहे कि, आता अनु कुठे राहते आणि काय करते. तर आज आपण तिच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

अनुचा आशिकी हा चित्रपट सुपर हिट ठरला होता. या चित्रपटानंतर अनु अनेक चित्रपट केले. मात्र त्या चित्रपटांना हवे तसे यश मिळाले नाही. अनुचे अनेक चित्रपट फ्लॉप होत असल्यामुळे तिचे करियर बुडू लागेल होते. याचा करियरला ठीक करण्याचा प्रयत्न करताना तिचा एक भीषण अपघात झाला होता. हा अपघात १९९९मध्ये झाला होता. रात्री एका पार्टीमधून परताना हा अपघात झाला होता.

अनुच्या गाडीला एक कारने जोरदार धडक दिली होती. हा अपघात इतका भीषण झाला होता कि, अनु रक्त बोंबाळ झाली होती. तिला अश्या अवस्तेथ कोणी ओळखू देखील शकले नव्हते. मात्र अपघांतानंतर अनुला ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु अनु इतक्या गंभीर अवस्तेथ होती कि ती जवळपास २९ दिवस कोमात केली होती. कोमातून बाहेर आल्यानंतर तिची स्मरणशक्ती सुद्धा गेली होती.

या अपघातानंतर अभिनेत्रींचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होत. तिला तिची स्मरणशक्ती गेल्यामुळे भूतकाळामधील काहीच आठवत नव्हते. स्मरणशक्ती पुन्हा मिळविण्यासाठी अभिनेत्री बिहार येथील मुंगेरमधील प्रसिद्ध योग साधना केंद्रात दाखल झाली होती. तिथे जाऊन ती खूप कठीण योगसाधना करू लागली होती. पुढे अनेक वर्षांनी तिला तिची स्मरणशक्ती पुन्हा मिळाली होती. परंतु तोवर वेळ निघून गेली होती. या काळामध्ये बॉलिवूडमधील लोक आणि प्रेक्षक तिला विसरले होते.

मात्र अनु तिच्या आजारपणातून बरी झाल्यानंतर तिने तिची सगळी संपत्ती तिने दान केली होती. सगळ्यांपासून आणि बॉलिवूडपासून लांब जाऊन तिने संन्यास घेतला होता. त्यानंतर तिने स्वतःच्या आयुष्यावर एक पुस्तक लिहले होते. त्याचे नाव Anusual- Memoir of a Girl who Came Back from the Dead असे ठेवले होते. तिचे हे पुस्तक खूप प्रसिद्ध देखील झाले होते.

दरम्यान अनु बॉलिवूडच्या या जगापासून खूप लांब गेली आहे. ती सध्या बिहारमध्येच राहू लागली आहे. तिथे ती लोकांना योग देखील शिकवते. तर या अपघातामुळे अनुचा चेहरा खूप बद्दल आहे. त्यामुळे अनुला ओळखणं देखल जरा कठीण झालं आहे.

Leave a Comment