काही दिवसांपूर्वी एका तरुणाने खूप थाटामाटामध्ये जुळ्या बहिणींसोबत लग्न केलं आहे. त्यामुळे सर्वत्र या तरुणाची चर्चा रंगली होती. त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (The boy name Atul Avtade married twin sisters)
अतुल आवताडे असे या तरुणाचे नाव आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी जुळ्या बहिणींसोबत लग्न केलं होत. त्यामुळे या तरुणाची सगळीकडे खूप चर्चा रंगत होती. परंतु लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तरुणासोबत असं काही घडलं कि, त्याला चौकशीसाठो पोलीस स्टेशनमध्ये जावे लागले होते.
या तरुणांबद्दल महिला आयोगाने चौकशी करायचे आदेश दिले होते. यावेळी अशी काही माहिती समोर आली आहे कि, ती माहिती ऐकून सगळ्यनांच आश्चर्याचा धक्का बसला आहे. माहिती नुसार जुळ्या मुलींसोबत लग्न करण्याच्या आधी अतुल अवताडेचे पहिले लग्न झाले आहे. त्याच्या पहिल्या पत्नीनेच महिला आयोगाकडे तक्रार केली होती.
त्यामुळे हा तरुण आता चांगलाच अडकला आहे. तसेच अतुलच्या पहिल्या पत्नीने अतुल विरुद्ध तक्रार केली आहे. मात्र त्या दोन जुळ्या बहिणींवर देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर या संधर्बात पोलीस चौकशी करत आहेत.
अतुल अवताडे याचे मूळ गाव सोलापूर जिल्यातील माळशिरस तालुक्यामधील महाळुंग हे आहे. त्याचा मुंबईमध्ये ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. तर या तरुणाने दोन जुळ्या बहिणींसोबत लग्न केलं आहे. रिंकी आणि पिंकी पाडगावकर असे त्या जुळ्या बहिणींचे नाव आहे. त्या दोघी देखील आयटी इंजिनिअर आहेत. दोघी बहिणींना बालपणापासून ते शेवटपर्यंत एकत्र राहायचे होते म्हणून त्यांनी एकाच तरुणासोबत लग्न केले आहे.
जुळ्या बहिणींसोबत अतुलने २ डिसेंबर २०२२ रोजी अकलूज येथील वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेलमध्ये लग्न केलं आहे. तर अतुलने रिंकी आणि पिंकीच्या आईच्या आजारपणामध्ये भरपूर मदत केली असल्याचे समजलं आहे. जुळ्या बहिणींपैकी एक अतुलच्या प्रेमात पडली होती. त्यामुळे त्या दोघींनी त्याचसोबत लग्नासाठी सहमती दिली.
दरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये समजलं आहे कि, जुळ्या बहिणींसोबत लग्न करण्याच्या आधी अतुलचे पहिले लग्न झालं होत. जेव्हा अतुलचे फोटो व्हायरल झाले. तेव्हा त्याच्या पहिल्या पत्नीने राज्य महिला आयोगाकडे त्याची तक्रार केली होती. त्यामुळे चौकशीला सुरवात झाली आहे. परंतु अद्यापि याबद्दल आणखी कोणतीच माहिती समोर आली नाही.