पक पक पकाक चित्रपटामधील साळूची भूमिका साकारणारी अभिनेत्री आता दिसते खूप हॉट आणि बोल्ड; फॉरेनरसोबत केलं होतं गुपचूप लग्न…

पक पक पकाक  हा मराठी चित्रपट २००५मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अनेक मराठी कलाकारांनी काम केलं होत. या चित्रपटामधील भुत्याची भूमिका नाना पाटेकर यांनी साकारली होती. तर चित्रपटामधली साळूची भूमिका अभिनेत्री नारायणी शास्त्री साकारली होती. (The actress Narayani Shastri who played the role of Salu in the Marathi movie Pak Pak Pakak looks very hot and bold)

या चित्रपटाला खूप प्रसिद्धी देखील मिळाली होती.  एक टीव्ही आणि थिएटर अभिनेत्री म्हणून अभिनेत्री नारायणी शास्त्रीला ओळखे जाते. मात्र ही अभिनेत्री आता ४४ वर्षाशी झाली आहे.  टेलिव्हिजनवर नारायणीने मुख्य अभिनेत्रीपासून ते आई आणि सासूच्या भूमिका देखील उत्तमरित्या साकारल्या आहेत. तिने आता पर्यंत अनेक भूमिका गाजवल्या आहेत.

२००० साली नारायणीने मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होत. छोट्या पडद्यावर नारायणी कहानी सात फेरे की या मालिकेमधून सगळ्यांसमोर आली होती.  त्यानंतर तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. यामुळे तिची टीव्ही इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

मालिकांसह तिने अनेक चित्रपटांमध्ये सुद्धा उत्तम अभिनयाचे प्रदर्शन दाखवलं आहे. घाट’, ‘मुंबई मेरी जान’ आणि ‘चांदनी बार’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये नारायणीने काम केलं आहे. या अभिनेत्रीने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलं असलं तरी तिला मराठी भाषा उत्तम येत होती. मराठी चित्रपट पक पक पकाक आणि ऋण यामध्ये नारायणीने  प्रमुख भूमिका साकारली आहे.

वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य नारायणी चांगल्या पद्धतीने सांभाळले आहे. मराठीसह अनेक हिंदी कलाकार सुद्धा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यमुळे प्रसिद्धीच्या झोतात असतात. परंतु नारायणीने तिचे वैयक्तिक आयुष्य नेहमी खाजगी ठेवले आहे. तब्बल लग्नाच्या दीड वर्षानंतर नारायणीने लग्न झाल्याची बातमी सर्वांना दिली होती.

माहिती नुसार परदेशी बॉयफ्रेंड स्टीवन ग्रेवर यासोबत २०१५ साली नारायणीने लग्न केलं आहे. मात्र तीने हे लग्न गुपचूप  केले होते. लग्न झाल्याची बातमी सुद्धा नारायणीने लग्नाच्या दीड वर्षानंतर चाहत्यांना दिली होती.

त्यामुळे तिच्या सर्व चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. सोशल मीडियावर स्टीव्हन ग्रेव्हरसोबत फोटो शेअर करत नारायणी ही माहिती सांगितली होती. नारायणीचा पती स्टीव्हन ग्रेव्हर हा ब्रिटीश आहे.

Leave a Comment