‘ही’ छोटी मुलगी आज आहे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री, नाव ऐकून व्हाल थक्क…

बॉलिवूडमधील डायना पेंटी ही खूप लोकप्रिय अभिनेत्री आहे. डायना दिसायला खूपच सुंदर आणि ग्लॅमरस आहे. आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांची मने जिंकली आतापर्यंत तिने काहीच चित्रपटांमध्ये काम केले. परंतु ज्या चित्रपटामध्ये काम केले आहे, त्यातील तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले आहे. काही दिवसांपासून डायना पुन्हा चर्चेमध्ये आली आहे. मात्र ती यावेळी आपल्या चित्रपटांमुळे नाही तर आपल्या काही गोंडस फोटोंमुळे आली आहे.

डायना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. यावर ती सतत तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. हे फोटो तिच्या लहानपणीचे आहेत. डायना आता जितकी सुंदर दिसते तितकीच ती लहानपणीसुद्धा खूप सुंदर दिसत होती. या फोटोंमध्ये डायना खूपच क्युट दिसत आहे. तीचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

डायनाचा जन्म मुंबईमध्ये एका पारसी आणि ख्रिश्चन कुटुंबामध्ये झाला होता. तिला लहानपणापासूनच मॉडेलिंगची प्रचंड आवड होती. तिने खूप कमी वयामध्ये मॉडेलिंग करायला सुरुवात केली. लहानपणापासूनच ती खूप सुंदर असल्यामुळे तिला मॉडेलिंगच्या ऑफर्स देखील भरपूर मिळायच्या.

डायनाने काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. डायनाने कॉकटेल या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत दीपिका पदुकोण आणि सैफ अली खान होते. दीपिका पादुकोण आणि डायना या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाल्या होत्या. तेव्हा लोकांचे असे म्हणणे होते की दोघींचा चेहऱ्यामध्ये बरेच साम्य आहे.

Leave a Comment