तारक मेहता फेम जेठालाल कार कलेक्शन पाहून व्हाल हैराण; फोटो बघून तुम्हही व्हाल चक्कीत…

छोट्या पाड्यावर तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका खूप लोकप्रिय झाली आहे. या मलिकने मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. टीव्हीवर ही मालिका गेल्या  १४ वर्षांपासून चालत आहेत. तसेच या मालिकेमधील सर्व कलाकार खूप लोकप्रिय झाले आहेत. (Tarak Mehta fame Jethalal actor dilip joshi had amazing car collection)

या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत जेठालाल आहे. दिलीप जोशी याने हे जेठालालचे पात्र साकारले आहे. संपूर्ण देशभरातून या पात्राला आणि अभिनेत्याला खूप प्रेम दिल जात आहे. तर जेठालालच्या भूमिकेमुळे  दिलीप जोशी खूप प्रसिद्ध झाला आहे. तसेच हा कलाकार खूप साधा राहतो. परंतु दिलीपला महगाड्या गाड्यांची खूप आवड आहे.

दिलीप सतत नवनवीन आणि लग्झरी कार विकत घेत असतो. तर आज आपण त्याच्या लग्झरी कार कलेक्शनबद्दल माहिती घेणार आहोत. दिलीपकडे किआ सोनेट(Kia Sonet), ऑडी क्यू ७(Audi Q7) आणि टोयोटा इनोव्हा क्रिस्टा(Innova Crysta) या कार्स असल्याचे समजले आहे.

दिलीपच्या कार कलेक्शनच्या यादीत पाहिली गाडी काळ्या रंगाची कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. या गाडीला किआ सोनेट असे देखील म्हणले जाते. तर ही गाडी तब्बल ७.९९ लाख रुपयांपासून सुरू होणारी गाडी आहे. १३.९९ लाख रुपये इतकी किंमत किआ सोनेटच्या टॉप मॉडेलची आहे.

तसेच या कारला अनेक स्मार्ट फीचर्स आहेत. त्यात टायर मॉनिटरिंग सिस्टिम,  २६.०३ सेंटीमीटरची टचस्क्रीन सिस्टिम, सुरक्षेसाठी ६ एअरबॅग्स अश्या फीचर्सचा समावेश आहे. या गाडीला पेट्रोल आणि डिझेलचे  दोन पर्याया देण्यात आले आहेत. १.५ सीआरडीआय डिझेलचे इंजिन आहे. जे ६ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक अशा पर्यायांमध्ये येते.

दिलीप जोशीच्या कार कलेक्शनमध्ये ऑडी क्यू ७ या गाडीचा देखील समावेश आहे. ही गाडी सर्वात महागडी गाडी म्हणून ओळखली जाते. ८३.३२ लाख रुपये ते ८८.९८ लाख रुपये इतकी या ७ सीटर गाडीची किंमत आहे. या गाडीला अनेक फेचर्स देण्यात आले आहेत.

त्यात ऑडी Q7 मध्ये १ डिझेल इंजिन आणि १ पेट्रोल इंजिन आहे. डिझेल इंजिन २९९५ cc आहे. तर पेट्रोल इंजिन २९९५ cc आहे. ही गाडी स्वयंचलित ट्रांसमिशनसह उपलब्ध आहे. तसेच इंजिनसोबत ८ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स सुद्धा देण्यात आला आहे.

या कारमध्ये  पॅनोरॅमिक सनरूफ, फोर-झोन क्लायमेट कंट्रोल, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करणारी १०.१-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे. सुरक्षेसाठी कारमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. त्यात लेन डिपार्चर वॉर्निंग, फ्रंट एंड रियर पार्किंग सेन्सर्स, पार्क असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल या फीचर्सचा समावेश आहे.

दिलीप जोशीच्या कार कलेक्शनमध्ये अजून एका आलिशान गाडीचं नाव सामील आहे. यादीत सामील असलेल्या गाडीचे नाव ७ सीटर एमपीव्ही टोयोटा इनोव्हा क्रिस्टा ही आहे. बाजारात १८.०९ लाख रुपये ते २३.८३ लाख रुपये इतकी या गाडीची किंमत आहे.

या गाडीचे  ५ व्हेरिएंट्स आहेत. जी, जी प्लस, जीएक्स, व्हीएक्स, आणि झेडएक्स अशे ते पाच व्हेरिएंट्स आहेत. तर  ७ सीटर आणि ८ सीटर अश्या केवळ दोन पर्यायांमध्ये ही गाडी येते. या गाडीला  २.७ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. १६६ पीएस पॉवर आणि २४५ एनएम टॉर्क जनरेट करण्यात हे इंजिन सक्षम आहे.

Leave a Comment