तारक मेहता फेम बबिताने केला धक्कादायक खुलासा; म्हणाली, माझ्या अंतर्वस्त्रात…

तारक मेहता का उलटा चष्मा(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)  टीव्हीवरील प्रसिद्ध मालिकांपैके एक आहे. ही मालिका इतकी लोकप्रिय आहे कि त्यातील सगळे कलाकारा प्रचंड प्रसिद्ध आहेत. त्यातील एक आहे मुनमुन दत्ता(Munmun Dutta)  म्हणजे सगळ्यांची लाडकी बबिता. नुकताच मुनमुन दत्ताने एका लैंगिक शोषणाचा धक्कादायक खुलासा केला होता. ही धक्कादायक गोष्ट तिने सोशल मीडियावर पोस्ट करत सर्वांना सांगितली. (Tarak Mehta Fame Babita Makes Shocking Disclosure Of Sexual Abuse; Said, in my underwear..)

हा खुलासा मुनमुनने २०१७ मध्ये केला होता. त्यात तिने सांगितले होते कि तिचे लैंगिक शोषण तिच्या काका, शिक्षक आणि चुलत भावाने केले होते. #metoo लिहीत मुनमुनने तिच्या पोस्ट ला सुरुवात केली. याबाबत माहिती देत मुनमुनने  लिहिली होत कि, “असे काही लिहिताना त्या गोष्टींची आठवण केल्यामुळे डोळ्यातून अश्रू येतात,

जेव्हा माझ्या बाजुला राहणारे काका आणि त्यांच्या नजरेची मला भीती वाटायची. जे संधी मिळाली की मला पकडायचे आणि मला धमकवायचे की कोणालाही काहीही सांगू नकोस. माझ्यापेक्षा वयाने मोठा असलेला माझा चुलत भाऊ किंवा ज्याने मला हॉस्पिटलमध्ये जन्म झाल्यानंतर पाहिले आणि १३ वर्षांनी माझ्या शरीराला स्पर्श करणे योग्य आहे असे त्याला वाटले, कारण मी लहान होते आणि माझ्या शरीरात बदल होत होते”.

पुढे तिने लिहले कि, माझे शिक्षक ज्याचा हात माझ्या अंडरपॅंट मध्ये होता. आणखी एक शिक्षक जो वर्गात असलेल्या मुलीच्या ब्राचा स्ट्रॅप खेचत ओरडायचा किंवा मग रेल्वे स्टेशनवरील तो व्यक्ती ज्याने मला पकडले होते”. अशी भावुक पोस्ट मुनमुनने केली होती.

आणखीन सांगत मुनमुन म्हणाली, ‘का? कारण तुम्ही खूप लहान आहात आणि बोलायला घाबरत आहात. एवढी भीती वाटते की तुमच्या पोटात गोळा येतो आणि गुदमरल्यासारखं वाटतं. तुम्हाला हे माहित नाही की तुम्ही तुमच्या पालकांना हे सगळं कसं समजावून सांगाल किंवा तुम्हाला कोणालाही एक शब्दही सांगण्याची लाज वाटते.’

‘मग तुम्हाला पुरुषांविषयी खूप राग येतो, कारण तुम्हाला माहित आहे की तुमचीजी परिस्थिती आहे त्याचे गुन्हेगार ते आहेत. त्या घाणेरड्या भावना त्या जाण्यासाठी वर्षे लागतात. मला आनंद आहे की या चळवळीत माझा आवज सामील झाला आहे आणि लोकांना याची जाणीव करून देते की त्यांनी मला ही सोडले नाही.

पण, आज कोणीतरी माझ्याशी असे काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल, तर मी त्याला सोडणार नाही. मी कोण आहे याचा मला अभिमान आहे.’असे देखील मुनमुनने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहले.

Leave a Comment