धक्कादायक!! विक्रम गोखले नंतर या जेष्ठ लावणीसम्राज्ञीचे निधन…

कलाविश्वामधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे सगळे कलाकार खूप हादरले आहेत. ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन झाले आहे. (Sulochana Chavan, a veteran lavani dancer, died tragically)

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण कलाविश्वामध्ये शोककळा पसरली आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी हे जग सोडलं आहे. सुलोचना चव्हाण यांचे निधन वृद्धपकालामुळे झाले आहे.

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या जाण्याने कलाविश्वामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 13 मार्च 1933 साली सुलोचना चव्हाण यांचा जन्म झाला होता. त्यांनी त्यांच्या कलेने हिंदी, मराठी, चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

सुलोचना चव्हाण यांचे शिक्षण फक्त चौथीपर्यंत झाले होते. मात्र त्यांना अनेक भाषा ज्ञात होत्या. त्यात मराठी ,भोजपुरी, हिंदी, गुजराती, तामीळ, पंजाबी अश्या भाषांचा समावेश होता. लावणीसम्राज्ञी म्हणून तर त्यांना सर्वत्र ओळख जात होते. परंतु त्या एक उत्तम गायिका देखील होत्या.

त्यांनी अनेक भाषेंमध्ये गीते गायिली आहेत. भोजपुरी, हिंदी, गुजराती, तामीळ, पंजाबी अश्या भाषांचा समावेश आहे. मात्र त्यांची खरी ओळख मराठीविश्वामध्ये एक लावणीसम्राज्ञी म्हणून तयार झाली. तर त्याच्या मेहनतीने त्यांना लावणीसम्राज्ञी हा पुरस्कार मिळाला होता. आचार्य अत्रे यांच्याकडूनहा  किताब त्यांना देण्यात आला होता.

बोर्डावरची लावणी माजघरात आणणाऱ्या सुलोचना चव्हाण यांनी त्यांच्या कलेने खूप मोठा चाहता वर्ग तयार केला होता. सुलोचना चव्हाण यांना कलाक्षेत्रासाठी त्यांच्या  मोठ्या बहिणीने प्रोत्साहन दिले होते. ७० हुन अधिक  हिंदी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन म्हणून सुलोचना चव्हाण यांनी लग्नाआधी काम केलं आहे.

वयाच्या अवघ्या १० वर्षापासून त्यांना गायनाला सुरुवात केली होती. भोजपुरी रामायण त्यांनी मन्ना डे यांच्यासोबत वयाच्या सोळाव्या वर्षी गायिलं होत. गायनासोबत त्यांनी लावण्या देखील केल्या आहेत. रंगल्या रात्री या चित्रपटातील सुलोचना चव्हाण यांच्या लावण्या खूपच प्रसिद्ध झाल्या होत्या.

यानंतर त्यांची ‘नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची मला हो म्हंत्यात लवंगी मिरची’ ही लावणी प्रचंड लोकप्रिय झाली होती.  सुलोचना चव्हाण यांनी अनेक लावण्या गाजवल्या होत्या. त्यात फड सांभाळ तुऱ्याला गं आला, तुझ्या उसाला लागंल कोल्हा ’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘कसं काय पाटील बरं हाय का?’  अशा अनेक लावण्या सुलोचना चव्हाण यांनी गायल्या आणि त्या खूप गाजल्या होत्या.

सुलोचना चव्हाण यांनी गायलेली गाणी आणि त्याच्या लावण्या लोक आज सुद्धा मन लावून ऐकतात दिसतात. त्यांनी केवळ लावण्यच नव्हे तर भावगीते आणि भक्तिगीते गाऊन लोकसंगीताचा दालन समृद्ध केला आहे.

Leave a Comment