मेकअपपासून दूर राहते साऊथची ‘ही’ अभिनेत्री; ‘या’ कारणासाठी नाकारली होती तब्बल २ करोडची जाहिरात…

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली.

ती केवळ अभिनेत्रीच नाही तर एक उत्तम डान्सर देखील आहे. ती नेहमीच चर्चेत असते. ती सर्वात जास्त चर्चेत तेव्हा आली जेव्हा तिने एका फेअरनेस क्रीमच्या २ करोडच्या जाहिरातीची ऑफर नाकारली होती. आज आम्ही तुम्हाला साई पल्लवीचा हाच किस्सा सांगणार आहोत.

नाकारली होती २ करोडची जाहिरात-

साई पल्लवी सर्वात जास्त चर्चेमध्ये आली होती जेव्हा तिने एका फेअरनेस क्रीमची २ करोडची जाहिरात नाकारली होती.

तीने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की अशाप्रकारच्या जाहिरातींमधून मिळणाऱ्या पैशाचे मी काय करू.  मी घरी जाणार आणि त्याच तीन चपात्या आणि भात खाणार. माझ्या गरजा जास्त नाहीत.

साई पल्लवीला मेकअपचा शोक नाही. ती मेकअपपासून दूर राहते. तुम्ही हे ऐकून थक्क व्हाल की ती चित्रपटाच्या शुटिंगवेळी खूप कमी मेकअप लावते आणि कधी कधी तर मेकअप करत नाही.

पेशाने आहे डॉक्टर-

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणारी आणि सौंदर्याने घायाळ करणारी अभिनेत्री साई पल्लवी एक डॉक्टर आहे. तीने तबिलिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, जॉर्जिया मधून एमबीबीएसची पदवी मिळविली आहे.

या चित्रपटातून केले होते पदार्पण-

अभिनेत्री साई पल्लवीने साऊथ चित्रपट सृष्टीत एंट्री करण्यापूर्वी तेलगू सीजन डान्स शो मध्ये भाग घेतला होता. तिने मल्याळम चित्रपट प्रेमम मधून इंडस्ट्रीत पदार्पण केले होते आणि फिदा चित्रपटातून तेलगू इंडस्ट्रीत पदार्पण केले.

अल्पावधीतच ती साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत दिसू लागली. साई पल्लवीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. फक्त साऊथ इंडियातच नाही तर पूर्ण भारतात तिचे चाहते आहेत.

Leave a Comment