धक्कादायक!! साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पसरली शोककळा; प्रसिद्ध लेखकाचे झाले संशयास्पद निधन…

गेल्या काही महिन्यांपासून चित्रपट सृष्टीमधून अनेक धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. आता साऊथ इंडस्ट्रीमध्ये एक दुःखद बातमी समजली आहे. मल्याळम रायटर सतीश बाबू पैय्यानूर यांचे निधन झाले आहे. गुरुवारी २४ नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतले आहे. परंतु त्यांचा मूर्तदेह संशयास्पद अवस्थेत आढळला आहे. (South film industry famous writer satheesh babu suspiciously pass away)

वयाच्या ५९व्या वर्षी रायटर सतीश बाबू यांचे निधन झाले आहे. मात्र त्यांच्या निधनाचे कोणतेच कारण अद्यापी समोर आले नाही. या लेकखाचा खूप संशयास्पद मृत्यू झाल्याचे समजत आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सतीश बाबू त्यांच्या घरी एकटेच होते. गुरुवारी रात्री त्यांची पत्नी माहेरी गेली होती. त्याच दिवशीच त्यांचे निधन झाले आहे. तर त्या रात्री त्यांच्या पत्नीने रायटर सतीश बाबू यांना खूप कॉल केले परंतु त्यांनी ते कॉल उचलले नाहीत. त्यामुळे त्यांची पत्नी देखील खूप घाबरली होती.

शेजारी चौकशी केल्यानंतर असे समजले कि, सतीश रात्री सात वाजल्यानंतर फ्लॅटच्या बाहेर आलेच नाहीत. त्यामुळे शेजारच्यांनी पोलिसांना याबद्दल कळवले होते. पोलीस आल्यानंतर फ्लॅटचा दरवाजा तोडण्यात आला होता. त्यावेळी रायटर सतीश बाबू यांचा संशयास्पद मृत्यूदेह सापडला होता.

तेव्हा त्यांची पत्नी देखील तिथे आली होती. अश्या अवस्थेमधील पतीचा मृत्यूदेह पाहून रायटरच्या पत्नीला देखील खूप मोठा धक्का बसला होता. तर पोलीस या घटनेचा तपस करत आहेत. पोलिसांनी रायटरचा मृत्यूदेह  शवविच्छेदनासाठी दिला आहे. त्यानंतर मृत्यूचं कारण समोर येईल असे पोलिसांनी सांगितले.

१९६३ साली पलक्कडमधील पाथिरिपाला येथे लघु कथाकार आणि उपन्यासकर सतीश बाबू यांचा जन्म झाला होता. त्यांनी त्यांचे शिक्षण कान्हांगड नेहरू कॉलेजमधून घेतले होते. पुढे ते  कथा, कविता आणि निबंध लेखना करू लागले होते. त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांमध्ये, त्यांनी कॅलिकट विद्यापीठाचा पहिला कॅम्पस पेपर, कॅम्पस टाइम्स संपादित केला आणि प्रकाशित केला होता. त्यांनी लिहिलेल्या पेरामराम, फोटो, दैवापुरा, मांजा सूर्यते नलुकल, कुडामणिकल किलुंगू रविल या कादंबऱ्यांचा समावेश आहे.

Leave a Comment