‘शिक्षणाच्या आईचा घो’ चित्रपटातील हि बालकलाकार आता झाली आहे मोठी, दिसायला देते सर्व अभिनेत्रींना टक्कर, पहा फोटो…

2010 साली महेश मांजरेकर दिग्दर्शित शिक्षणाचा आईचा घो हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामध्ये भरत जाधव मुख्य भूमिके मध्ये आहे. तसेच त्याच्यासोबत दोन बाल कलाकारही होते. या तिघांच्या उत्तम अभिनयामुळे चित्रपट सुपरहिट ठरला.

प्रेक्षकांना हा चित्रपट अतिशय आवडला होता. या चित्रपटांमध्ये अनेक इतर कलाकारही होते सचिन खेडेकर,सक्षम कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव आणि क्रांती रेडकर.

या सिनेमातील बालकलाकार आता मोठे झाले आहेत हे बालकलाकार म्हणजे सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य. या दोघांना ओळखणे आता कठीण झाले आहे.

गौरी वैद्य आणि सक्षम कुलकर्णी या दोघांनी ‘दे धक्का’ हा चित्रपटही सोबत केला आहे. ‘उगवली शुक्राची चांदणी’ हे गाणे तिच्यावर चित्रित केले होते आणि ते अगदी सुपरहिट ठरले.

गौरी आता 26 वर्षाची झाली आहे तिने मुंबईतील माटुंगा येथील डी जी रुपारेल महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. तसेच इंजीनियरिंग अँड कंप्यूटर टेक्नोलॉजी ची डिग्री घेतली.

आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिने सिनेसृष्टी पासून काही काळा दुरावा घेतला आहे. परंतु ती आता आपल्याला पुन्हा दिसणार असल्याची शक्यता आहे. कारण आता दे धक्का चा सिक्वल येण्याची चर्चा रंगत आहे त्यामुळे यात गौरी ची भूमिका असण्याची शक्यता दिसत आहे.

Leave a Comment