जिला समजत होतो छोटी-मोठी अभिनेत्री ती तर निघाली प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरची बहीण, फोटोज पाहून व्हाल थक्क…

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. कबीर सिंग या चित्रपटामुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. एका  मुलाखतीमध्ये त्याने सांगितले की तो त्याच्या वडिलांना खूप कमी वेळा भेटायचा.

तो मुख्यतः त्याच्या वडिलांना त्यांच्या वाढदिवसादिवशी भेटायचा. तो त्याच्या वडिलांच्या आणि सावत्र भाऊच्या खूप जवळ आहे.

शाहिद कपूरच्या वडिलांचे नाव पंकज कपूर असे आहे. शाहिद कपूर लहान असतानाच त्याचे आईवडील विभक्त झाले. घटस्फोटानंतर तो आणि त्याची आई नवी दिल्ली येथे त्याच्या आजोळी राहत होते.

शाहिद कपूरने स्वतःच्या हिमतीच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने इश्क विष्क या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

त्याने कधीच त्याच्या वडिलांची ओळख सांगितली नाही. जे काही केले ते स्वतःच्या बळावर. शाहिदच्या म्हणण्याप्रमाणे खूप कमी लोक आहेत ज्यांना माहिती आहे की त्याला एक बहीण आहे आणि तिचे नाव सना कपूर असे आहे. अभिनेता पंकज कपूर आणि अभिनेत्री सुप्रिया पाठक यांची ती मुलगी आहे. शाहिद कपूरच्या शानदार या सिनेमामध्ये तिने भूमिका साकारली होती.

सध्या ती दिग्दर्शक अभिषेक सक्सेना यांच्या सरोज का रिश्ता या चित्रपटात सरोजची भूमिका साकारणार आहे. सना ही शाहिद कपूरची सावत्र बहीण आहे. तिची एंगेजमेंट झाली आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव मयंक असे आहे. मयंक मनोज आणि सीमा पाहवा यांचा मुलगा आहे.

सना कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यावर ती सतत तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिचा शानदार हा सिनेमा बॉक्सऑफिसवर काही खास कमाल करू शकला नाही परंतु या सिनेमामुळे तिला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली.

Leave a Comment