खाली पहा दिग्गज अभिनेता सयाजी शिंदे यांचे कधी न पाहिलेले फोटो…

सयाजी शिंदे (Bollywood Actor Sayaji Shinde) या मराठमोळ्या अभिनेत्याची वेगळी ओळख करून देण्याची आज आवश्यकता वाटत नाही. कारण सयाजी शिंदे आज एक भारतीय अभिनेता बनला आहे. त्यांनी मराठी नाटकांसोबतच मराठी, हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, गुजराती चित्रपटात आपला ठसा उमटवला आहे.

सयाजी शिंदे यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा (Satara, Maharashtra) जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात झाला. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे गाव सोडलं. सातारा शहर गाठलं. नाईट वॉचमनकी करून मराठी विषयात पदवी घेतली.

महाविद्यालय जीवनात हौशी नाटकं करता करता सयाजी शिंदे आज मराठीच नाही तर हिंदीसोबत दाक्षिणात्या सिनेसृष्टी देखील गाजवत आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावा असाच सयाजी शिंदे यांचा प्रवास आहे. आज सयाजी शिंदे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊ या त्यांच्या सिनेप्रवासाबद्दल…

सयाजी शिंदे यांचा जन्म 13 जानेवारी 1959 रोजी सातारा जिल्ह्यातील वेळे-कामती नावाच्या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात झाला. गावात राहात असताना सयाजी यांना त्यांच्यात दडलेला अभिनेता स्वस्थ बसू देत नव्हता.

अखेर सयाजी यांनी गाव सोडून सातारा गाठले. सयाजी यांनी मराठी भाषेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाचा ‘नाईट वॉचमन’ नोकरी करत अभिनय करिअरची सुरूवात केली.

तेव्हा सयाजी शिंदे यांचा 165 रुपये दरमहा पगार होता. यादरम्यान, साताऱ्यात सयाजी यांची गाठ सुनील कुलकर्णी या रंगकर्मीशी पडली आणि खऱ्या अर्थाने सयाजी यांच्या फेम प्रवासाला सुरूवात झाली.

सयाजी शिंदे यांनी 1978 मध्ये मराठी एकांकिका स्पर्धेतून सगळ्यांना स्वत:ची ओळख करून दिली. हीच त्यांच्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात म्हणावी लागेल. 1987 मध्ये ‘झुल्वा’ नावाच्या मराठी नाटकातील त्यांचा अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

तेव्हापासून त्यांना चाहत्यांनी भरभरून लोकप्रियता मिळवून दिली. सयाजी शिंदे यांनी नियमितपणे नाटकांमधून भूमिका करायला सुरूवात केली. पण आपल्याल्या अभिनयगुणांना अजून वाव मिळावा, या भावनेतून सयाजी यांनी मुंबई गाठली. मुंबईत अनेक थिएटर वर्कशॉप करत असतानाच अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले.

थिएटर करत असतानाच त्याना अबोली हा चित्रपट मिळाला. अबोलीमधील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान देखील झाला. थिएटर आणि मराठी चित्रपट करत असतानाच सयाजी यांना पहिला हिंदी चित्रपट मिळाला.

‘शूल’ चित्रपटानंतर सयाजी शिंदे यांनी मागे वळून पाहिले नाही. सयाजी यांनी आज मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्येही त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘गोष्ट छोटी डोंगरा एवढी’ या चित्रपटात कृषीमंत्री म्हणून त्यांची भूमिका सर्वांच्या लक्षात राहाणारी आहे.

चित्रपटांमधून अफाट यश, कीर्ती, प्रतिष्ठा सोबत पैसा मिळवलेल्या सयाजी शिंदेंचे पाय आजही गावच्या मातीच घट्ट रोवलेले आहेत. ते जरी शहरात राहात असले तरी गावाच्या मातीशी त्यांची नाळ तुटलेली नाही.

सामाजिक बांधिलकीतून सयाजी यांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी सयाजी यांची धडपड सुरू आहे. सन 2016 मध्ये साताऱ्यात त्यांनी प्रत्येक शाळेत नर्सरी असा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे.

सयाजी उद्यान या उपक्रमातून ते राज्यभरात वृक्षरोपण मोहिम राबवत आहेत. सयाजी शिंदे यांनी अलिकडेच सह्याद्री देवराई हा नवा उपक्रम सुरू केला आहे.

Leave a Comment