खाली पहा सचिन तेंडुलकरच्या मुलीच्या लग्नाचे फोटो…

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर बऱ्याचदा चर्चेत असतो. भारतरत्न या पुरस्काराने त्याला सन्मानित केले गेले आहे. त्याची मुलगी सारा तेंडुलकर(Sara Tendulkar) सोशल मीडियावर खूप चर्चेत असते.

ती भलेही अभिनेत्री नसेल, मात्र तिची लोकप्रियता एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. सोशल मीडियावर साराचे काही फोटो व्हायरल होत आहेत ज्या फोटोच्या चर्चेला सोशल मीडियावर उधाण आले आहे. (Sachin Tendulkar’s daughter Sara Tendulkar will soon get married)

सारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. यावर ती सतत तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. नुकतेच तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत.

तिचे हे फोटो पाहून सारे जण विचारात पडले आहेत. या फोटोत तिच्या हाताला मेहंदी लागल्याचे दिसत आहे. हा फोटो पाहून अनेकांना सारा तेंडुलकरच लग्न झाले कि काय असे प्रश्न पडले आहेत.

परंतु, दुसऱ्या फोटोत सारासोबत एक दुसरी मुलगी दिसत आहे. साराने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “तिच्या बहिणीचं लग्न होत आहे आणि ती यासाठी खूप उत्सुक आहे.”

सारा लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करेल असे अंदाज बांधले जात आहेत. सारा शाहिद कपूरसोबत एका चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे.

परंतु साराचे वडील सचिन तेंडुलकर यांनी या अफवांना पूर्णविराम लावला. तसेच, साराने याआधीच मॉडेलिंगमध्ये पदार्पण केले होते. काही महिन्यांपूर्वी साराने अजिओलक्स ब्रॅण्डसाठी प्रमोशनल शुटदेखील केले होते.

सचिन तेंडुलकरने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, सारा अजूनही तिच्या अभ्यासात मग्न आहे. सध्या तिला चित्रपटात दिसण्याची इच्छा नाही.

सारा तेंडुलकरच नाव बऱ्याचवेळा क्रिकेटर शुभमन गिलसोबत जोडले गेले. परंतु, दोघांनीदेखील या नात्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती सांगितली नाही.

सारा तेंडुलकर खूप सुंदर दिसते. तिच्या आईप्रमाणेच ती दिसायला सुंदर आहे. साराचे इंस्टाग्रामवर २.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. ती केवळ ५२२ लोकांना फॉलो करते.

यात शाहरुख खान, रणवीर सिंग, विकी कौशल आणि आलिया भट्ट यांचा समावेश होतो. सारा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

Leave a Comment