खूपच हृदयद्रावक आहे सलमान खानच्या सावत्र आई हेलनची स्टोरी, माहीत करून घ्या कशी बनली सलीम खानची पत्नी…

बॉलिवूडमधील भाईजान अर्थात सलमान खानने आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. सलमान खानची सावत्र आई हेलन तिच्या काळातील एक खूप गाजलेली आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. उत्तम अभिनय आणि डान्सच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. हेलनचे पूर्ण नाव हेलन रिचर्ड्सन असे आहे.

तिचे वडील म्यानमारच्या सेनेमध्ये होते आणि युद्धाच्या दरम्यान ते धारातीर्थी पडले. त्यानंतर हेलनची आई आणि ती भारतामध्ये आली. त्यामुळे त्यांची आर्थिक  परिस्थिती काही खास नव्हती. हेलनने गुजारा करण्यासाठी डान्स करणे सुरु केले.

हेलनच्या सौन्दर्याने लाखो चाहत्यांना भुरळ घातली होती. हेलन यांचे चित्रपट निर्माते पीएन अरोरा यांच्यावर प्रेम जडले. रेल का डीब्बामध्ये त्यांनी डान्स केला होता आणि याचवेळी चित्रपट निर्माते पीएन अरोडा हेलनवर फिदा झाले. हेलनने पीएन अरोडासोबत लग्न केले. काही काळानंतर लग्न झाल्यावर त्यांच्यात वाद निर्माण होऊ लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, वादाचे कारण होते की लग्नाच्या इतक्या वर्षानंतर देखील हेलनला मूल होत नव्हते. हेलनच्या चित्रपटाचे बुकिंग अमाऊंट, कॅश आणि चेक पेमेंट पीएन अरोरा आपल्या ताब्यात ठेवत असत. हेलनची सर्व कमाई पीएन अरोरा स्वतः जवळ ठेवत असत. त्यामुळे दोघांमध्ये वाद वाढत होते.

अनेकदा हेलनला तिच्या पतीने मारहाण केल्याची बातमी वृत्तपत्रांमध्ये छापत असत. हेलन ही भारतीय वंशाची नसल्यामुळे तिला येथील रीती-रिवाजांबद्दल काही माहिती नव्हती. यामुळे तिचे खूप मित्र देखील नव्हते. हेलनची सर्व कमाई तिच्या पतीने हडप केली त्यामुळे तिने दिलीप कुमार यांच्याकडे मदत मागितली की किमान त्यांचे पैसेतरी बँकेत जमा करावेत.

हेलनच्या पतीने त्यांच्याकडून चित्रपटदेखील काढून घ्यायला सुरुवात केली त्यामुळे तिला सी ग्रेड चित्रपटांमध्ये देखील काम करावे लागले. शेवटी हेलनने १९७३ मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर शोलेच्या आयकॉनिक नंबरच्या शूटिंग दरम्यान तिची सलीम खान यांच्यासोबत जवळीकता वाढली. सलीम खानने त्यावेळी हेलनला खूप पाठिंबा दिला.

सलीम खान आणि हेलन यांचे प्रेम जुळले. ते दोघे ८ वर्ष रिलेशन मध्ये होते. सलीम यांचे पहिले लग्न सुशीला चरक (सलमा) यांच्यासोबत झाले होते. त्यांना चार मुले देखील होती. परंतु तरी देखील सलीम खानने हेलनसोबत विवाह केला. सुरुवातीला मुलांनी हे नातं मान्य केले नाही. परंतु हळू हळू त्यांनी हेलनला स्वीकारले.

Leave a Comment