‘सैराट’फेम तानाजी गालगुंड ‘या’ आजाराशी देतोय झुंज; रुग्णालयातील व्हिडिओ आला समोर…

सैराट या सुपरहिट मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. या चित्रपटाने तब्बल शंभर कोटींचा व्यवसाय केला होता.

या चित्रपटाचा हिंदी मध्ये देखील रिमेक बनवला होता. त्याने देखील चांगली कमाई केली. धडक या नावाने हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित झाला होता.

धडक मध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांची जोडी आपल्याला पाहायला मिळाली. सैराटची क्रेझ अजूनदेखील कायम आहे.

सैराट चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. यातील गाणे चाहत्यांच्या ओठी रेंगाळतात. अजय अतुल यांनी आपल्या संगीताने मंत्रमुग्ध केलेली गाणी चाहत्यांना फारच आवडली. सैराट मधील प्रत्येक कलाकाराचे अभिनय प्रेक्षकांना खूप आवडले.

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाची कहाणी ही आर्ची आणि परश्या या दोन प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमीयुगलांची आहे.

आर्ची ही एका श्रीमंत घरातील तर परश्या हा खालच्या जातीतील गरीब घरातील दाखवला होता. कॉलेजमध्ये यांचं प्रेम जुळत आणि नंतर घडतो तो सैराट. सगळ्यात शेवटी या दोघांचा खून करण्यात येतो आणि ऑनर किलिंग होते.

याचसाठी चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यासाठी हा चित्रपट नागराज मंजुळे यांनी केला होता.

या चित्रपटामध्ये आर्चीची भूमिका रिंकू राजगुरू हीने साकारली होती. परश्याची भूमिका आकाश ठोसर याने साकारली होती. या दोघांच्याही भूमिकांचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले.

यानंतर दोघांनीही बऱ्याच चित्रपटांमध्ये कामे केली. सैराट चित्रपटामध्ये परशा सोबत लंगड्या आणि सल्ल्या या भूमिका देखील खूप लोकप्रिय झाल्या होत्या.

या चित्रपटात सारेच नवोदित कलाकार असून देखील त्यांनी ज्या प्रकारे भूमिका बजावली त्याचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. लंगड्या हि भूमिका अभिनेता तानाजी गलगुंडे याने साकारली होती.

तानाजी गलगुंडे हा एकेदिवशी एवढा मोठा अभिनेता होईल, असे त्याच्या गावकऱ्यांना देखील वाटले नव्हते. गावात त्याला कोणी विचारत नसे.

सैराट चित्रपट तयार झाल्यानंतर अनेक लोक त्याची विचारपूस करू लागले. त्याने सैराट चित्रपटानंतर कन्नड रिमिक्समध्ये देखील काम केले. गस्त या मराठी चित्रपटामध्ये देखील तो झळकला.

झी मराठीवरील मन झालं बाजींद या मालिकेमध्ये देखील त्याने एक छोटी भूमिका केली होती. मध्यंतरी तानाजी न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आला होता.

शरीराची सकारात्मकता या विषयावर त्याने हे फोटोशूट केले होते. तानाजी याच्याबाबतीत एक बातमी समोर आली आहे. तो सध्या आजारी पडला असून त्याच्या पोटामध्ये खूप दुखत असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टर अमेय ठाकूर हे त्याच्यावर उपचार करत असून त्याच्या काही वैद्यकीय चाचण्या देखील करण्यात आल्या आहेत. तो लवकरच या आजारातून बरा होईल, असे ठाकूर यांनी सांगितले आहे.

Leave a Comment