दिपीकाच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी; या भयानक आजाराशी देतेय झुंज…

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने तिच्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली आहेत. बॉलिवूडची डिंपल गर्ल  म्हणून तिला सर्वत्र ओळखलं जाते. ही अभिनेत्री सतत तिच्या अभिनयामुळे आणि वेगळ्या अंदाजामुळे चर्चेत असते.(Sad news for Deepika’s fans; Deepika suffers from this terrible disease)

परंतु सध्या तिच्या होणाऱ्या चर्चेने तिच्या चाहत्यांना चिंतेत पडलं आहे. या अभिनेत्रीची अचानक तब्येत खराब झाल्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. परंतु मिळालेल्या माहितीनुसार तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून तिला डिस्चार्ज मिळाला आहे.

मात्र ही पहिली वेळ नाही कि दीपिकाला असे ताबडतोब रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या आधी देखील दीपिकाला तिच्या अस्वस्थतेमुळे अचानक रुग्णालयात नेण्यात आले  होते. परंतु तिचे चाहते आता चिंतेत येऊ लागले आहे. वारंवार दीपिकाची तब्येत बिगडत असल्यामुळे तिचे चाहते तिला आता प्रश्न विचारू लागले आहेत. दीपिकाला कोणता आजार आहे? दीपिका पदुकोणला कोणत्या आजाराने ग्रासलं आहे? असे प्रश्न तिचे चाहते विचारू लागले आहेत.

अचानक दीपिकाची प्रकृती बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर विविध उपचार देखील करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार आता तिची प्रकृती ठीक झाली आहे. मात्र तिचे चाहते तिच्या तब्येती साठी प्रार्थना देखील करत आहेत. यापूर्वी देखील दीपिकाला हैद्राबादमध्ये असताना अचानक तिच्या हृदयाचे ठोके वाढले असल्यामुळे तिला  रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ती प्रभाससोबत तिच्या  ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटा काम करत होते.

त्यावेळी दीपिकाला अर्धा दिवस डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवले होते.  डॉक्टरांनीं दिलेल्या माहिती नुसार दीपिकाला हार्ट अरिथमीया नावाचा आजार झाला आहे. बॉलिवूडमध्ये यापूर्वी अनेक सेलिब्रिटींचा या आजाराने मृत्यू झाल्याचे समजले आहे. त्यामुळे दीपिकाचे चाहते खूपं चिंतेत दिसत आहेत.

हार्ट अरिथमीया असे या आजाराचे नाव आहे. ज्या आजारामुळे दीपिका ग्रस्त आहे. हा गजराज हृदयाशी निगडित आहे. या आजारात हृदयाच्या ठोक्यात वाद होते. हृदयाच्या गती आणि लय मागे हृदयाची विद्युत प्रक्रिया असते. जे विद्युत आवेग चालवत असते.

हृदयाच्या स्नायूंच्या क्रियाकलापांमध्ये हे सिग्नल समन्वय साधत असतात. ज्यामुळे आपले हृदय खूप सहजतेने रक्त आत बाहेर पंप होते. विद्युत आवेगा किंवा मार्गातील समस्यामुळे अतालताची समस्या उद्भवतात. बहुतेक प्रकरणांमध्ये हृदयाच्या अतालतामुळे कोणते देखील नुकसान होत नाही. परंतु या समस्या मेंदू, फुफ्फुस, हृदय किंवा इतर महत्त्वाच्या अवयवांमध्ये रक्तप्रवाहात समस्या निर्माण करतात तेव्हा मात्र हे प्राण घातक ठरू शकते. 

Leave a Comment