सचिन पिळगावकर यांची सख्खी बहीण दिसते डिटो सचिनची कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल थक्क….

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सचिन पिळगावकर यांचे नाव खूप आदराने घेतले जाते. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. (sachin Pilgaonkar’s sister Trupti Pilgaonkar look like sachin’s carbon copy)

सचिन यांनी अभिनेते म्हणून तर त्यांची ओळख निर्माण केलीच आहे. परंतु ते एक उत्तम दिग्दर्शक आणि गायक देखील आहे. चित्रपट सृष्टीमध्ये सचिन यांनी त्यांची एक वेगळी छाप पडली आहे.  अनेक वर्षांपासून मराठी सृष्टीमध्ये पिळगावकर कुटुंब प्रेक्षकांचे मनोरंजन करत आलं आहे.

सचिन पिळगावकर यांचे वडील शरद पिळगावकर हे चित्रपट निर्माते होते. सचिन हे उत्तम अभिनेता,  दिग्दर्शक तसेच गायक आहेत. त्यांची पत्नी देखील एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तसेच सचिन आणि सुप्रिया यांनी मुंबईमध्ये आल्यानंतर स्वतःचा ऑर्केस्ट्रा सुरु केला होता. त्यात ते स्वतः आणि त्यांची पत्नी गात होते.

शरद पिळगावकर यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केलं होती. चोरावर मोर, अपराध, अष्टविनायक अश्या मराठी चित्रपटामधून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. अष्टविनायक हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटामध्ये शरद पिळगावकर यांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच सचिन यांना मुख्य भूमिका साकारण्याची संधी दिली होती. सचिन यांच्यासाठी हा चित्रपट नायक म्हणून काम केलेला पहिला चित्रपट होता.

हा माझा मार्ग एकला या चित्रपटामध्ये वयाच्या साडे चार वर्षी सचिन पिळगावकर यांनी बालकलाकार म्हणून पदार्पण केले होते. त्यावेळी त्यांची भूमिका खूप जंगली होती. तसेच त्यांच्या भूमिकेचं खूप कौतुक देखील करण्यात आले होते. त्या भूमिकेसाठी सचिन यांना  सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कारा देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट केले आणि स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली होती.

नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटामध्ये सचिन आणि सुप्रिया यांनी मुख्य पत्राचे काम केले होते. तसेच माहिती नुसार मुख्य नायिकेसाठी सुप्रिया यांचे नाव सचिन यांच्या आईने सुचवले होते. यानंतर पुढे जाऊन सचिन आणि सुप्रिया यांनी लग्न केलं होत. मात्र सुप्रिया यांनी सचिन यांच्यासोबत लग्न करण्याचं कारण काय या बद्दल एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

तेव्हा सुप्रिया म्हणाल्या होत्या कि, मी सचिनचे बालपणीचे चित्रपट पाहिले होते. तो लहान असताना खूप गोंडस दिसत होता. सचिनशी लग्न केल्यावर आपल्यालाही अशी गोंडस मुलं होतील या विचाराने मी त्याच्याशी लग्न करण्यास होकार दिला. असे त्या म्हणल्या होत्या.

१ डिसेंबर १९८५ साली सचिन आणि सुप्रिया लग्न बंधनात अडकले होते. या दोघांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. या दोघांना एक मुलगी आहे. तिचे नाव श्रिया पिळगावकर असे आहे. ते देखील चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. अभिनयासोबत तिने चित्रपटाचे  डायरेक्शन देखील केलं आहे.

सचिन पिळगावकर यांनी अशी हि बनवा बनवी या चित्रपटामध्ये साडी घालून जो अभिनय केला होता. त्याची एक वेगळीच फॅन फॉलोइंग आहे. तेव्हा पासून सगळयांना वाटते कि त्यांना जर बहीण असती तर ती हूबेहू सचिन यांच्या सारखी दिसली असती.

सचिन यांना एक सख्खी बहीण बहीण आहे. सचिन त्यांच्या बहिणीसोबतचे अनेक फोटो शेअर करत असतात.  तृप्ती पिळगावकर असे त्यांच्या बहिणेचे नाव आहे. ती सध्या तिच्या कुटुंबासोबत ऑस्ट्रेलियामध्ये राहते.  मात्र सचिन आणि त्यांची बहीण दिसल्या एकसारखे आहेत.  तृप्ती यांचे सगळं शिक्षण मुंबई मधेच झालं आहे.

Leave a Comment