अभिनेत्री रंजना सोबत काम केलेला हा बालकलाकार आहे का लक्षात? रंजना सोबत ह्या बालकलाकाराचं होत हे नातं…

चित्रपट विश्वामध्ये काही असे चित्रपट होते ज्यात अभिनेत्रींना खूप कमी काम असायचे. परंतु अश्या परिस्तिथी मध्ये देखील अनेक अभिनेत्रींनी त्यांची एक खास ओळख चित्रपट विश्वात निर्माण केली आहे. अभिनेत्री रंजना यांचे देखील या यादीत नाव आहे. (Remember this child actor sushant ray who worked with actress Ranjana?)

अभिनेत्री रंजना यांनी चित्रपटांमध्ये काम करून त्यांच्या अभिनयाने आणि त्यांच्या सौंदर्याने अनेकांच्या मानत घर केलं आहे. रंजना यांच्या आई देखील एक अभिनेत्री होत्या. वत्सला देशमुख असे त्यांच्या आईचे नाव आहे. त्यांनी ६० ते ७० च्या दशकामध्ये त्यांच्या अभिनयाची जादू सगळ्यांवर फेरली होती. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटामध्ये काम केलं आहे. नवरंग, स्री, दो आँखे बारा हाथ, पिंजरा, अमर भूपाळी अश्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर त्यांनी अनेक मराठी चित्रपटामध्ये सुद्धा काम केलं आहे.

वत्सला देशमुख यांची बहीण संध्या सुद्धा नाटक क्षेत्रात कार्यरत होत्या. संध्या यांचे लग्नाआधीचे नाव विजया देशमुख असे होते. त्यांना मराठी हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते व्ही शांताराम यांनी पहिला ब्रेक दिला होता. अमर भूपाळी या चित्रपटामधून संध्या यांनी अभिनयक्षेत्रामध्ये पदार्पण केलं होत. हा चित्रपट खूप प्रसिद्ध झाला होता. तब्बल  १०४ आठवडे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चालत होता.

व्ही शांताराम आणि संध्या एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु व्ही शांताराम यांचे पहिले लग्न विमलाबाई यांच्यासोबत झाले होते. विमलाबाई यांच्या पासून व्ही शांताराम यांना  प्रभात कुमार, सरोज, मधुरा आणि चारुशीला अशी चार मुलं आहेत.

तर व्ही शांताराम यांच्या पहिली पत्नी विमलाबाई यांची मुलगी चारुशीला यांचा मुलगा सिद्धार्थ रे याने देखील चित्रपटांमध्ये त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशी ही बनवाबनवी या सुपरहिट चित्रपटामध्ये त्यानी शंतनूची भूमिका साकारली होती. मराठीसह सिद्धार्थने अनेक हिंदी चित्रपटामध्ये काम केलं आहे. परंतु अनेक वर्षा पूर्वी सिद्धार्थचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले होते.

मधुरा या मुलीने प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक पंडित जसराज यांच्यासोबत लग्न केलं होत. लग्नानंतर या दोघांना  दुर्गा नावाची मुलगी झाली आहे. तिने देखील अनेक हिंदी कार्यक्रमात काम केलं आहे.

अभिनेत्री जयश्रीसोबत व्ही शांताराम यांनी दुसरं लग्न केलं होत. त्यांच्या पासून व्ही शांताराम यांना किरण राजश्री आणि तेजश्री अशी तीन मुलं आहेत. परंतु या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्यामुळे या दोघांनी घटस्फोट घेण्याचा  निर्णय घेतला होता. त्यानंतर व्ही शांताराम यांनी अभिनेत्री संध्या यांच्यासोबत तिसरे लग्न केले होते.

लग्नानंतर व्ही शांताराम आणि संध्या यांना मुलं झाले नाही. त्यामुळे व्ही शांताराम यांची ७ मुलं संध्या यांनी त्यांची मुलं असल्यासारखी सांभाळली होती. त्यामुळे नात्याने सिद्धार्थ रे संध्या यांचा नातू आहे. संध्याची बहीण वत्सला देशमुख ही अभिनेत्री रांजनाची आई आहे. म्हणजेच सिद्धार्थ रे रंजनाच्या सख्या मावशीचा नातू. त्यामुळे रंजना आणि सिद्धार्थ मावशी आणि भाचा हे नाते आहे.

चानी या मराठी चित्रपटामध्ये सिद्धार्थने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. तर रंजना या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका करत होत्या. या दोघांनी या चित्रपटामध्ये एकत्र काम केलं आहे.  व्ही शांताराम यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

Leave a Comment