सिंघम चित्रपटातील शिवा आठवला? त्याने ‘या’ मराठी अभिनेत्रीसोबत केलय लग्न, नाव जाणून व्हाल थक्क…

आपल्या दमदार अभिनयाने आणि आणि फिटनेसने चाहत्यांना वेड लावणारा अभिनेता म्हणजे अशोक समर्थ. याने उत्तम अभिनयाच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे. त्याची पत्नी देखील एक गाजलेली मराठी अभिनेत्री आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तर आज या बातमीतून जणू घेऊयात की ती अभिनेत्री नक्की आहे तरी कोण आणि अशोक समर्थचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता?

अशोक समर्थ हा महाराष्ट्रातील बारामती इथला आहे. त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आणि पैलवानगीची खूप आवड होती. १० वी १२ वी मध्ये असताना त्याने आपल्या गावी अनेक कुस्त्या खेळल्या होत्या.

त्याच शालेय शिक्षण बारामतीमध्येच पूर्ण झाल. पुढील शिक्षणासाठी तो पुण्यात आला. शिक्षण सुरु असतानाच त्याला अभिनयात रस वाटू लागला आणि तो अभिनेता बनण्यासाठी मुंबईला गेला. मुंबईला गेल्यावर त्याने छोट्या पडद्यावर कामे करायला सुरुवात केली. माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून त्याने मालिका क्षेत्रात पदार्पण केले. त्याची लक्ष मालिका तर तुम्हाला माहीत असेल. यामध्ये अशोकने अभय कीर्तिकरची भूमिका साकारली होती.

या मालिकेतील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक केले गेले. तब्बल ५ वर्ष चाललेल्या या मालिकेने अशोकला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. इन्सान या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पुढे रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम या चित्रपटामध्ये त्याला अभिनय करण्याची संधी मिळाली. यामध्ये त्याने शिवाची भूमिका साकारली. यामधील त्याचे डायलॉग देखील खूप फेमस झाले आहेत. त्याने या भूमिकेला चार चांद लावले.

२०१३ साली आलेल्या चित्रपट ट्रॅफिक जिममध्ये त्याची ओळख अभिनेत्री शीतल पाठक सोबत झाली. या चित्रपटामध्ये दोघे देखील मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. २१ फेब्रुवारी २०११ रोजी हे दोघे विवाहबद्ध झाले. शीतलने अनेक चित्रपटांमध्ये कामे केली आहेत.

मंडळी तुमच्यासाठी कायपण, चेहरा, गाव माझं तंटामुक्त, तात्या विंचू लगे राहो, सामर्थ्य, अशा चित्रपटांमध्ये तीने उत्तम भूमिका साकारली आहे. अशोकचे दिग्दर्शक व्हायचे स्वप्न देखील आहे. हे स्वप्न देखील लवकरच पूर्ण होणार आहे. जननी या आगामी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अशोक समर्थ करणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Leave a Comment