प्रत्येकाला जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा कधी ना कधी आपल्या आयुष्यामधील केलेल्या अनेक चुका आठवतात. पण नंतर त्यावर विचार करून काहीच उपयोग नसतो.
असे अनेक बॉलिवूड कलाकारांच्या बाबतीत झाले आहे ते विचार करतातच. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टार बद्दल सांगणार आहोत जिच्यासोबत असेच काहीसे घडले होते.
हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीना रॉयसोबत देखील असेच झाले होते. तिच्या एका चुकीमुळे तिचे पूर्ण आयुष्याला कलाटणी मिळाली. ती चूक कोणती होती हे आज आपण जाणून घेऊयात.
एका चुकीमुळे बदलले रीना रॉयचे आयुष्य-
बॉलिवूडमधील ८० च्या दशकाची प्रसिद्ध आणि गाजलेली अभिनेत्री रीना रॉयने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली होती.
तिने पाकिस्तानी क्रिकेटर मोहसीन खानसोबत लग्न केले. त्यावेळी तिने बॉलीवूडला रामराम ठोकला. त्यावेळेस रीनाचे बॉलिवूड करिअर यशाचे शिखर गाठत चालले होते. ती आपल्या हॉटनेसमुळे चांगलीच चर्चेत होती.
निर्माता-दिग्दर्शक तिला बक्कळ रक्कम देऊन आपल्या चित्रपटामध्ये घेऊ इच्छित होते. तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत होते.
परंतु मोहसीनच्या प्रेमामध्ये बुडलेल्या रीना रॉयने तिच्या करिअरला लाथ मारली आणि हिंदुस्थानातून कायमची निघून गेली.
पाकिस्तानमध्ये जाऊन तिने आपल्या पती सोबत नवीन आयुष्याची सुरुवात केली. परंतु तिथे जाऊन तिच्या नशिबाने तिला साथ दिली नाही.
तिला समजले की बॉलिवूड सोडण्याचा निर्णय हा खुप चुकीचा होता. ती पुन्हा भारतामध्ये आली. रीना रॉयने एका मुलाखतीमध्ये याविषयी सांगितले.
प्रेमात तिने सर्व काही गमवून टाकले होते. तिने केलेली मेहनत, कठोर परिश्रम सर्व काही ती गमावून बसली होती. त्या काळात तिला सर्वात आघाडीची अभिनेत्री मानले जात होते परंतु लग्न केल्यानंतर तिने सर्व काही सोडले आणि हीच तिची सर्वात मोठी चूक होती.
नई दुनिया या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करू शकला नाही परंतु यानंतर तिचा जैसे को तैसा हा चित्रपट हिट ठरला. तिचा जन्म ७ जानेवारी १९५७ रोजी झाला.
रीना रॉयने अनेक हिट चित्रपटांत काम केले. नागीण अरपण, जानी दुश्मन, आदमी खिलौना है, प्रेम तपस्या, नशीब, धर्म कांटा, बदल कि आग, प्यासा सावन अशा अनेक सुपरहिट चित्रपटांत रीनाने महत्वपूर्ण भूमिका साकारली.
रीना रॉय आता आपल्या एकुलत्या एक मुलीसोबत मुंबईमध्ये राहते आणि तिची मुलगी डायरेक्शनच्या कामामध्ये कार्यरत आहे.