खाली पहा हास्य जत्रा फेम ‘प्रभाकर मोरे’ यांच्या अलिशान जीवनातील न पाहिलेले फोटो…

प्रभाकर मोरे हे मराठीमधील एक ज्येष्ठ अभिनेते आहेत ज्यांनी मराठी नाटक चित्रपट या सारख्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन केले आहे.

महाराष्ट्रातील कॉमेडी अभिनेते मधील ते एक आहेत. त्यांनी आत्तापर्यंत खूप सार्‍या मराठी नाटकांमध्ये कॉमेडी व्यक्तिरेखा साकारलेल्या आहेत.

चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील एक विनोदी अभिनेता Prabhakar More यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती. प्रभाकर मोरे हे एक कॉमेडी अभिनेता आहे त्यासोबतच ते एक डायरेक्टर सुद्धा आहेत. मराठी नाटकं पासून त्यांनी आपल्या अभिनय क्षेत्रांमध्ये आपले पाऊल ठेवले.

रत्नागिरी चिपळूण मध्ये जन्म झालेल्या अभिनेता प्रभाकर मोरे यांनी आपले शालेय शिक्षण New English School Vahal मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण DBJ College Chiplun मधून पूर्ण केलेले आहे.

अभिनेता प्रभाकर मोरे यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी नाटकं पासून केलेली आहे. मराठी मधील सुप्रसिद्ध डायरेक्टर निर्माते आणि लेखक संतोष पवार यांच्या नाटकांमध्ये अभिनेता प्रभाकर मोरे यांनी भूमिका केलेल्या आहेत.

तसेच त्यांनी प्रसाद खांडेकर लिखित नाटकांमध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे. प्रसाद खांडेकर आणि प्रभाकर मोरे यांची मैत्री Maharashtrachi Hasya Jatra च्या आधीपासून आहे. प्रसाद खांडेकर यांच्या लिखित नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे.

मराठी नाटकांमध्ये अभिनय करत असताना त्यांना मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

वर्ष 2012 मध्ये त्यांनी कुटुंब या मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.

वर्ष 2015 मध्ये त्यांना “बाई ग बाई” या चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली, आणि याच वर्षी त्यांचा कट्टी बट्टी चित्रपट प्रदर्शित झाला होता.

वर्ष 2018 मध्ये त्यांनी कॉमेडी चित्रपट बरायान या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.

वर्ष 2019 मध्ये त्यांनी महेश मांजरेकर दिग्दर्शित “भाई व्यक्ती की वल्ली” या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.

Leave a Comment