लोकप्रिय गायक लकी आली पोस्ट झाली व्हायरल; म्हणाला, घरी पत्नी, मुलं एकटी आहेत, मला मदत करा…

प्रसिद्ध गायक लकी अली ज्याने त्याच्या आवाजाने अनेकांना वेड लावलं आहे. ९०च्या दशकामध्ये पॉप कल्चरला बॉलिवूडमध्ये लकी अलीने एक वेगळं स्थान मिळून दिल होत. परंतु हा गायक आता मोठ्या संकटातमध्ये सापडायलचे समजत आहे. (Popular singer Lucky Ali’s post went viral)

प्रसिद्ध गायक लकी अलीची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. लकी अलीच्या जमिनीवर काही लोकांना कब्जा केल्याचे समजलं आहे. ज्यामुळे लकीने पोलिसांकडे मदत मागितली आहे. मदत मागत लकीने त्याच्या फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यानी सर्व प्रकार सांगितलं आहे.

पोस्टमध्ये लकीने त्याच्या जमिनीवर कब्जा करण्यात एक आयएएस अधीकारी देखील सामील असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्याची ही पोस्ट प्रचंड प्रमाणात व्हायरल होता आहे. त्याच्या या पोस्टमध्ये त्याच्या जमिनीवर कब्जा कसा आणि कोणी केला याबद्दल स्पष्ट सांगितलं आहे.

फेसबुक पोस्ट लिहीत लकी म्हणाला कि, त्याच्या जमीवर काही लोकांनी जबरदस्ती कब्जा केला आहे. त्यामुळे लकीने हे पत्र कर्नाटकच्या डीजीपी यांना लिहलं आहे. या पत्रामध्ये लकी म्हणाला कि, त्याचे नाव मकसूद अली आहे. तो दिवंगत अभिनेते आणि विनोदवीर मेहमूद आली यांचा मुलगा आहे.

परंतु मला लकी आली म्हणून देखील ओळखले जाते. मात्र तो त्याच्या कामामुळे दुबईमध्ये अडकला आहे. त्यामुळे डीजीपीने त्याच्या या प्रकरणात मदत करावी अशी विनंती त्यानी पत्रात केली आहे.

पत्रामध्ये लकीने पुढे लिहले कि, केंचनहल्ली येलाहंका येथील ट्रस्टची मालमत्ता असलेल्या माझ्या शेतावर बेंगळुरू भूमाफिया सुधीर रेड्डी आणि मधु रेड्डी यांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले आहे. रोहिणी सिंधुरी नावाच्या आयएएस अधिकाऱ्याच्या मदतीने ते आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी राज्याच्या संसाधनांचा गैरवापर करत आहे. ते बळजबरीने आणि बेकायदेशीरपणे माझ्या शेतात येत आहेत आणि संबंधित कागदपत्रे दाखवण्यास नकार देत आहेत.

वकिलाने मला सांगितलं आहे की, हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. ५० वर्षांपासून मी इथे राहत असल्यामुळे त्या कब्जा खोरांना माझ्या  फार्महाउसवर कब्जा करण्याचे न्यायालयीन अधिकार नाही. एसीपीकडे या बाबतीत तक्रार केली आहे. परंतु कोणताच सकरात्मक प्रतिसाद अद्यापि मिळाला नाही. तसेच त्या फार्महाऊसमध्ये माझी पत्नी लहान मुलांसोबत एकटी राहत आहे.

स्थानिक पोलिसांकडे तक्रार करून सुद्धा आता पर्यंत कोणतीच मदत मिळाली नाही. त्याउलट ते पोलीस अधिकारी कब्जा खोरांना पाठीशी घालत आहेत. ७ डिसेंबर रोजी होणार्‍या अंतिम न्यायालयीन सुनावणीपूर्वी खोटा ताबा सिद्ध करण्याचा त्यांचा हा बेकायदेशीर कृती थांबवण्यासाठी मी तुमच्या मदतीची विनंती करतो. कृपया आमची मदत करा कारण हे लोकांपर्यंत नेण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. असे लिहत त्यांनी ही पोस्ट केली आहे.

Leave a Comment