‘पंढरीची वारी’ चित्रपटातील हि अभिनेत्री आता आहे या अवस्थेत, तिला ओळखणेही झाले कठीण, पहा फोटो…

भारतामध्ये ज्या दिवशी जे सण आहेत त्या दिवशी दूरचित्रवाणीवर आपल्याला त्या संबंधित सिनेमे पाहायला मिळतात. कार्तिकी एकादशी दिवशी ही अगदी तसेच होते आपल्याला एकादशी संदर्भातील सिनेमे पाहायला मिळतात. त्यापैकी एक म्हणजे ‘पंढरीची वारी’ हा होय.

1988 साली रमाकांत कवठेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला. आजही हा सिनेमा लागल्यानंतर प्रेक्षक अगदी आवडीने तो सिनेमा पाहतात. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांनी काम केले आहे जसे की, अशोक सराफ, जयश्री गडकर ,आशा काळे.

तसेच या सिनेमामध्ये एका बाल कलाकाराने सर्वांचे लक्ष हेरले होते तो म्हणजे बकुळ कवठेकर. याचसोबत आपल्या आधार कार्ड अभिनयाने आणखीन एका नायिकेने लक्ष वेधले होते ती म्हणजे नंदिनी जोग. नंदिनी जोग यांच्या पिक्चर मधील एक गाणे अत्यंत सुपरहिट ठरले ते म्हणजे ‘धरिला पंढरीचा चोर’.

अभिनेत्री नंदिनी जोग या मराठी चित्रपट सृष्टीतील सहाय्यक अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. पंढरीची वारी या चित्रपटाव्यतिरिक्त त्यांनी कळत नकळत, वाजवू का, थांब थांब जाऊ नको लांब, दे धडक बेधकडक अशा चित्रपटातून सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत.

अशोक सराफ, विजय कदम अशा मातब्बर कलाकारांसोबत त्यांना झळकण्याची संधी मिळाली. नंदिनी जोग या मूळच्या अकोल्याच्या परंतु लग्न करून पुण्यातच त्या स्थायिक झाल्या आहेत. जाहिरात क्षेत्रात कार्यरत असलेल्या अभिजित जोग यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या.

अभिजित जोग यांनी पुण्यात ‘प्रतिसाद ऍडव्हरटायझिंग’ नावाने एजन्सी उभारली आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते ऍडव्हरटायझिंग तसेच ब्रँडिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. याच क्षेत्राशी निगडित असलेले “ब्रँडनामा” या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले आहे. तर त्यांचा मुलगा ‘अनिश जोग’ हाही मराठी चित्रपट क्षेत्राशी निगडित असलेला पाहायला मिळतो.

Leave a Comment