नीता अंबानी वापरतात इतक्या किंमतीचे स्वेटर; किंमत जाणून फुटेल घाम…

देशभरात उद्योगपती मुकेश अंबानी यांना ओळखले जाते. अंबानी कुटुंबाची गणना श्रीमंत कुटुंबामध्ये केली जाते. मात्र साध्या सोशल मीडियावर उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांच्याबद्दल चर्चा होताना दिसत आहे.  (Nita Ambani’s wore sweaters worth 84,603 thousand and 21 lakhs rupees)

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी श्रीमंत व्यक्तिमहत्व म्हणून सर्वत्र ओळखले जातात. निना यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाच्या मालकिण आहेत. तसेच अंबानी कुटुंब सतत चर्चेचा विषय ठरत असते.

नुकतंच मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साकारपूडा थाटामाटात पार पडला आहे. त्यावेळी अनंत आणि राधिका यांनी खूप आलिशान कपडे परिधान केले होते.

तसेच नीता अंबानी सर्वत्र  त्याच्या लूकमुळे ओळखल्या जातात. सध्या सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. अशातच सोशल मीडियावर नीता अंबानी यांचा स्वेटर परिधान केलेला एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. त्यांचे हे फोटो त्यांच्या एका फॅन पेजने पोस्ट केले आहेत. हे फोटो नीता अंबानींचे लंडन ट्रिपचे आहेत. या फोटोमध्ये त्यांनी विंटर लूक केल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या नीता अंबानी यांचे दोन फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

त्यातील एका फोटोमध्ये दिसत आहे कि, नीता अंबानी यांनी पांढरा शर्ट घातला आहे. त्यावर त्यांनी ब्लॅक कलरचा फ्लोअर टीशर्ट परिधान केल्याचे दिसत आहे. तो फ्लोअर टीशर्ट डॉल्से अँड गब्बाना या महागड्या कंपनीचा आहे. मात्र त्याची किंमत तब्बल  84,603 रुपये आहे.

याचसोबत नीता अंबानी यांचा दुसरा फोटो देखील खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये देखील त्यांचा लुक खूपच छान दिसत आहे. या फोटोमध्ये त्यांनी एक राखाडी रंगाचा फर कोट घातला आहे. हा कोट चिंचिल्ला या कंपनीचा आहे. तसेच या कोटला Yues Salomon म्हणतात. या फर कोटची किंमत सुमारे २१ लाख आहे.

सोशल मीडियावर नीता अंबानी यांच्या विंटर कलेक्शन पाहून चाहते कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया कळवत आहेत. अनेक चाहत्यांना नीता अंबानी यांच्या कपड्यांची किंमत ऐकून धक्का बसला आहे. नीता अंबानी त्यांच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखल्या जातात. नीता अंबानी या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापक आहेत.

Leave a Comment