पहा ‘हास्य जत्रा’ मधील निखिल बनेचे चाळीतील घराचे कधी न पाहिलेले फोटो…

यशाला शॉर्ट कट किंवा कोणताही चीट कोड नसतो; त्याला हवी असते ती मेहनत आणि प्रामाणिकपणा. याचं उत्तम उदाहरण ठरला आहे निखिल बने.

आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांपासून मनोरंजनविश्वातील कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या या कलाकारानं आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या विनोदवीरांबरोबर बसण्याचा मान मिळवला आहे.

आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत भाग घेत निखिलनं त्याचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यानं छोटी-मोठी कामं केली. सातत्यानं बॅक स्टेजला मदत करण्यासाठी निखिल उभा राहायचा.

खुल्या एकांकिका स्पर्धेतही त्याचं काम गाजलं आहे. हे सगळं करत असतानाच विनायक कदम या त्याच्या मित्रानं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमासाठी काम करशील का म्हणून विचारलं.

हास्यजत्रेच्या बॅक स्टेजसाठी काम करत करत निखिल छोट्या-छोट्या पात्रांमधून त्याच्या अभिनयाची जादू दाखवत होता. त्यानं साकारलेल्या छोट्या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतंच; शिवाय हास्यजत्रेच्या कलाकारांचीही ती पात्र फार आवडीची होती.

बॅक स्टेजचा हा कलाकार विनोदवीरांबरोबर सोफ्यावर विराजमान व्हावा अशी अनेकांची इच्छा होती. ही इच्छा लक्षात घेऊन कार्यक्रमाचे दिग्दर्शक-निर्माते सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांनी निखिलला सोफ्यावर कायमची जागा देत त्याला विनोदवीर बनवलं आहे.

एकांकिका, हास्यजत्रा बॅक स्टेज ते छोट्या भूमिका आणि आता विनोदवीर अशी यशाची प्रत्येक पायरी निखिलनं जोमानं आणि जिद्दीनं पार केलीय. त्याच्या याच प्रामाणिकपणाचं आणि जिद्दीचं हे त्याला मिळालेलं फळ आहे.

बॅक स्टेज कलाकार असो वा रंगमंचावरील अभिनेता; प्रत्येकाला संयम शिकवला तो एकांकिकेनं. एकांकिकेत काम करत असताना विनायकशी मैत्री झाली. त्याच्यामुळे आज इथपर्यंत आलोय.

त्याचे आभार मानावे तितके कमी आहेतच; पण स्वप्नपूर्तीसाठी मला संपूर्ण हास्यजत्रा टीम, सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सरांचे मनापासून आभार मानायचे आहेत.

Leave a Comment