कोट्यवधी रुपयांचे मालक असलेले अभिनेता नाना पाटेकर जगतात खूप साधे जीवन; कारण ऐकून बसले धक्का…

नाना पाटेकर हे नाव चित्रपटसृष्टीमध्ये खूप गाजलेल्या नावांपैकी एक आहे. चार दशकांपासून नाना  चित्रपटसृष्टी कार्यरत आहेत. त्यांनी अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे. (Multi-crore actor Nana Patekar lives a very simple life; hearing the reason you will be amaze)

नाना पाटेकर यांनी अनेकांना त्यांच्या अभिनयाने त्यांचे चाहते बनवले आहे. त्यांनी अनेक चित्रपटामध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. परंतु त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय त्यांच्या आधीच्या परिस्थितीमुळे घेतला होता. त्याचमुळे ते आज देखील खूप साधी जीवन शैलीने जगणं पसंत करतात.

हे खूप कमी लोकांना माहिती आहे कि, अभिनय क्षेत्रामध्ये येण्याच्या आधी नाना पाटेकर रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग रंगवण्याचे काम करत होते. नानांनी अप्लाइड आर्टमध्ये पोस्ट ग्रॅज्युए केलं आहे. त्याचसोबत ते एक  स्केच आर्टिस्ट देखील आहेत. नाना मुंबई पोलिसांना मदत म्हणून आरोपींचे स्केच बनवून देतात.

नाना त्यांच्या कामाचा खूप आदर करतात. तसेच नानांना जेव्हा प्रहार हा चित्रपट करायचा होता तेव्हा त्यांनी या चित्रपटासाठी तब्बल ३ वर्ष लष्काराचे प्रशिक्षण घेतलं होते. मिळालेल्या माहितीनुसार नानांकडे तब्बल ७२ कोटींच्या संपत्ती आहे.

त्यांच्या कडे फार्महाऊस, कार आणि इतर कोट्यवधीच्या संपत्तीचा समावेश आहे. इतकं काही  त्यांच्याकडे असून सुद्धा ते एकदम साधे आयुष्य जगतात. नानांना सामान्य आयुष्य जगायला खूप आवडते. पुण्यामध्ये खडकवासला येथे नाना पाटेकर यांचे २५ एकरांमध्ये पसरलेले शानदार फार्महाऊस आहे. नाना शहराच्या गजबजाटापासून दूर श्वास घेण्यासाठी त्या फार्महाऊसमध्ये जातात.

नानाच्या याच फार्महाऊसवर २००८ मध्ये प्रदर्शित झालेला एक : द पावर ऑफ वन या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. हा चित्रपट संगीत सिवान यांनी दिग्दर्शित केला होता. नाना या ठिकाणी धान्य, गहू आणि हरभरा याची शेती देखील करतात. त्यांनी त्या फार्महाउस जवळ अनेक झाडं-झुडपं लावली आहेत.

त्यांच्या या फार्महाउसवर अनेक  गायी-म्हशी आहेत. या फार्महाऊसला तब्बल ७ खोल्या आहेत. या ७ खोल्या वगळता त्यांच्या फार्महाउसमध्ये एक मोठा हॉल आहे. नाना पाटेकर यांनी फर्निचर आणि टेराकोटा फ्लोरने त्यांचं फार्महाऊस सजवले आहे.

याशिवाय ८१ लाख रुपयांची ऑडी-Q7 कार नानांकडे आहे. त्याचसोबत १० लाखांची महिंद्रा स्कॉर्पियो आणि दीड लाख रुपयांची रॉयल इनफिल्ड क्लासिक-३५० गाडी आहे. प्रत्येकाने आपल्या गरजेनुसारच खर्च करावा असे नानांचे म्हणे आहे. त्यामुळे ते कोट्याधीश जरी असेल तरी साधे जीवन जगतात.

Leave a Comment