मिथुन चक्रवर्तीची मुलगी दिसते माधुरी दीक्षितपेक्षा भारी, पाहून व्हाल दंग…

बॉलिवूड मधील ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज देखील मिथुन येणाऱ्या नव्या पिढीसोबत तोडीस तोड भूमिका करत आहेत. (mithun chakraborty daughter)

त्यांनी बॉलिवूडमधील एक काळ आपल्या उत्तम चित्रपटातून चांगलाच गाजवला आहे. मिथुनचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर जगभरात पसरला आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय चित्रपट  पुरस्कार देखील मिळाले आहेत. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या जवळच्या माणसाबद्दल सांगणार आहोत.

मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलीचे नाव दिशानी असे आहे. दिशानी दिसायला खूपच सुंदर आहे. ती मिथुन आणि योगिता बाली यांची मुलगी आहे. तिला तीन भाऊ देखील आहेत. दिशानी भावंडांमध्ये सर्वात लहान आहे.

मिथुन यांनी दिशानीला दत्तक घेतले होते ही गोष्ट फार कमी लोकांना ठाऊक आहे. तिचे खरे पालक तिला कचऱ्याच्या ढिगात सोडून गेले होते. मिथुन यांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांना बाळाला दत्तक घेण्याची इच्छा झाली. तिला मिथुन यांनी आपल्या घरी आणले. दिशानी आता २० वर्षांची झाली आहे. ती आता खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.

दिशानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. यावर ती सतत तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या फोटोंना खूप लाईक्स मिळतात. सोशल मीडियावर तिचे फॅन फॉलोईंग खूप आहे. अद्याप तिने चित्रपटात  पदार्पण केले नाही.

Leave a Comment