अभिनेते अनंत जोग यांची पत्नीही नाही तर त्यांची मुलगी सुद्धा आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, वाचा सविस्तर…

अनंत जोग यांना ओळखत नाही असे कोणीच नाही, खलनायक म्हणाले की आपल्या समोर मराठी चित्रपटातील अनेक नाव समोर येतात जसे सयाजी शिंदे, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, विजू खोटे, मोहन जोशी या मराठी कलाकारांनी मराठी चित्रपट बरोबर हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा आपला ठसा उमटवला आहे,

खलायनक म्हणाले की ही नावे आपल्या समोर लगेच येतात. अनंत जोग यांनी मराठी चित्रपटां बरोबरच हिंदी चित्रपटमध्ये सुद्धा खलनायकाची भूमिका साकारली आहे, सिंघम, रावडी राठोड, नो एन्ट्री, शांघाय, दहेक, कच्ची सडक, सरकार, लाल सलाम, रिस्क, या सारख्या एक से बडकर चित्रपटामध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे.

अभिनेते अनंत जोग यांची हिंदी चित्रपटामध्ये केलेली खलनायकाची भूमिका प्रेक्षकांना भरपूर आवडली, त्यांनी आपल्या भन्नाट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनेते अनंत जोग यांनी हिंदी – मराठी चित्रपटच नाही तर हिंदी – मराठी मालिकेमध्ये सुद्धा अनेक भूमिका साकारल्या आहेत.

चित्रपट सृष्टी मध्ये आपल्या खलनायकाची भूमिका भन्नाट करणारे आणि एक वेगळे स्थान निर्माण करणारे मराठी अभिनेते अनंत जोग. अभिनेते अनंत जोग यांच्या प्रमाणेच त्यांची पत्नी सुद्धा एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. त्यांच्या पत्नीचे नाव उज्वला जोग आहे, यांचा सुद्धा वेगळा प्रेक्षक वर्ग महाराष्ट्र मध्ये आहे, उज्वला जोग यांनी आपली कारकीर्द मराठी मालिका आणि मराठी नाटकामधून सुरू केली.

त्यांनी ‘कुंकू लावते माहेरचे’, ‘सौभाग्य कांकन’, ‘नवरा बायको’ या सारख्या मराठी मालिकेमधून प्रेक्षकांची मने जिंकली, आणि त्यांच्या भूमिकेने ही प्रेक्षकांना मनात एक वेगळे स्थान निर्माण केले, त्यांनी अनेक मराठी नाटकामध्ये सुद्धा आपली उत्कृष्ट अभिनय सादर केला, त्यांची ‘सूर्याची पिल्ले’ ‘ढोल ताशे’ ‘लुका छुपी’ ही नाटके खूप गाजलेली आहेत,

आजही त्यांची उत्कृष्ट भूमिका चाहत्यांना भुरळ पाडते. अभिनेते अनंत जोग आणि उज्वला जोग या दोघांप्रमाणे त्यांची कन्या सुद्धा मराठी चित्रपट सृष्टी मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावत आहे. आई वडिलांचे नाव तिने उंच शिखरावर पोचवले आहे. खूप कमी लोकांना अभिनेते अनंत जोग आणि उज्वला जोग यांच्या कन्यबद्दल माहिती आहे.

त्यांच्या मुलीचे नाव क्षिती जोग आहे. आपल्या आई आणि वडिलांचा अभिनय बघत बघत मोठी झालेली क्षिती जोग यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि स्वतःचा एक नवा चाहता वर्ग निर्माण करत स्वतःला सिद्ध देखील केले. क्षिती जोग यांनी अनेक मराठी मालिकेमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

त्यांनी ‘दामिनी’ या मालिके मधून अभिनयाला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी ‘तू तिथे मी’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मराठी मालिके बरोबरच अनेक हिंदी मालिका जसे ‘घर की लक्ष्मी बेटिया’, सारा भाई vs सारा भाई’, ‘ये रीश्ता क्या कहलाता हे’ या मालिकेमध्ये त्यांनी आपला अभिनय सादर केला आहे,

त्यांचा प्रेक्षक वर्ग महाराष्ट्र मध्ये नाही तर संपूर्ण भारता बरोबर संपूर्ण जगामध्ये आहे. अभिनेत्री क्षिती जोग यांनी अभिनेते आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या बरोबर लग्न केले आहे. हेमंत ढोमे सुद्धा प्रसिद्ध अभिनेते आहेत त्यांनी अनेक मराठी चित्रपटामध्ये आपला अभिनय साकारला आहे, त्यांनी “पोस्टर गर्ल” या चित्रपटामध्ये काम केले आहे तसेच अनेक मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

क्षिती जोग आणि हेमंत ढोमे हे सोशल मीडिया वर खूप सक्रिय असतात, ते अनेक फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असतात आणि त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या जीवन शैलीत शामिल करत असतात. आशा करतो वायरल कट्टा टीमचे हा लेख तुम्हाला आवडला असेल, आवडला असेल तर आपल्या मित्र परिवार सोबत नक्की शेअर करा, आणि आमचे पे’ज नक्की ला’ईक करा. धन्यवाद!

Leave a Comment