हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरातच्या हळदीचे फोटो झाले व्हायरल; हळदीमध्ये या कलाकारांनी लावली होती हजेरी…

महाराष्ट्रभरात सर्वत्र लग्नाचे उत्सव सुरु असल्याचे पाहिला मिळत आहे. नुकतंच क्रिकेटपटू के एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी  यांचं लग्न झालं आहे.

तर यानंतर आता मराठी अभिनेत्री लग्न करणार असल्याचे समजलं आहे. तसेच अभिनेत्री वनिता खरातच्या हळदीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात तिच्या अभिनयाने आणि विनोदाने घरोघरी पोहचली आहे. ही अभिनेत्री लवकरच लग्न बांधत अडकणार असल्याचे वृत्त समोर येत आहेत. तिच्या लग्नाची बातमी स्वतः वनिता तिच्या चाहत्यांसोबत एक पोस्ट शेअर करत केली होती.

सध्या सोशल मीडियावर विनीताची जोरदार चर्चा होत आहे. तसेच या अभिनेत्रीचे हळदीच्या कार्यक्रमामधील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर तिच्या मित्रमैत्रिणींनी वनिताच्या हळदीच्या कार्यक्रमातील फोटो शेअर केले आहेत.

या सर्व फोटोमध्ये वनिताच्या हळदीचा कार्यक्रम झाला असल्याचे दिसत आहे. तसेच ती या फोटोमध्ये खूप खुश दिसत आहे. वनितासोबत या फोटोंमध्ये तिचा होणार पती सुमित देखील खूप खुश दिसत आहे. काहीं फोटोंमध्ये वनिता आनांदात डान्स करताना दिसत आहे.

अनेक कलाकार वनिताच्या हळीदीच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. तसेच महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधील अनेक कलाकार देखील हजार असल्याचे दिसले आहे.  वनिताने काही महिन्यांपूर्वीच  तिच्या रिलेशनशिपबद्दल उघडपणे सर्वांना सांगितलं होत.  वनिता आणि सुमित रिलेशनशिपमध्ये असून, लवकरच लग्न करणार असल्याचे देखील तिने सांगितलं होत.

वनिता आणि सुमितने दिवाळी आणि नवीन वर्ष एकत्र साजरे केले आहे. याचे अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. वनिता लग्न करत असून तिच्या लग्नाचे फोटो अजून समोर आलेले नाहीत.

वनिताने तिच्या लग्नाची  तारिक  ‘सरला एक कोटी चित्रपटाच्या ट्रेलर लाँन्चवेळी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितली होती. वनिता आणि सुमित 2 फेब्रुवारी रोजी लग्न करणार आहेत. मालिकांसोबत वनिताने अनेक  चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाची झलक दाखवली आहे. तसेच सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर म्हणून सर्वत्र ओळखला जातो.

दरम्यान, अलिकडेचं छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडपं हार्दिक जोशी (Hardik Joshi) आणि अक्षया देवधर  (Akshaya Devdhar) यांनी लग्न केलं आहे. तर आता लवकरच सुमीत  आणि वनिता लग्न बंधनात अडकणार आहेत. यामुळे त्यांचे सर्व चाहते खूप आनंद असल्याचे दिसत आहे.

Leave a Comment