माधुरी दीक्षितने आपल्या मुलांबद्दल केला मोठा खुलासा, घटना सांगताना डोळ्यात आले पाणी…

८०आणि ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो लोकांची मने जिंकली आहेत.तिने आपल्या अभिनयाची अशी जादू चालवली आहे की ती संपूर्ण देशाच्या हृदयाचे ठोके बनली आहे. आजही प्रेक्षक माधुरी दीक्षितला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

माधुरी टीव्हीवर ‘डान्स दिवाने’ या प्रसिद्ध शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसते. या शोमध्ये माधुरी दीक्षित एकदा खूप भावूक झाली होती.तिने शो दरम्यान खुलासा केला होता की, तिचे मुलगे कधी कधी तिला महत्त्व देत नाहीत.

तिचा परफॉर्मन्स दिल्यानंतर एका स्पर्धकाने सांगितले होते की, “मला माझ्या आईच्या फोनकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आणि तिला महत्त्व न दिल्याबद्दल खेद वाटतो.” स्पर्धकाचे हे ऐकून माधुरी दीक्षितही खूप भावूक झाली आणि तिने तिची व्यथा सर्वांसमोर मांडली.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित जरी चित्रपटांपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. माधुरी दीक्षितनेही तिच्या मुलासोबतचे फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत, जे चाहत्यांना खूप आवडतात.

Leave a Comment