‘लगान’ चित्रपटातील आमिर खानची गोरी मेम आठवतेय का? वयाच्या ५२ व्या वयात दिसते अशी!

सन २००१ साली ‘लगान’ चित्रपट आला होता. या चित्रपटामधील आमिर खानची भूमिका आजही त्याच्या करिअरमधील सर्वात चांगल्या भूमिकांपैकी एक आहे. या चित्रपमध्ये त्याने जीव ओतून काम केलं होतं.

तसेच यातील आमिरची गोरी मेम रिचेल शेली, जिने आमिरला आणि त्याच्या टिमला क्रिकेट मॅच जिंकण्यास साह्य केलं होतं. तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे. तुम्हाला माहीत आहे का की, आज ती २० वर्षानंतर कशी दिसते?

लगान’ चित्रपटातील सर्वच कलाकारांनी जीव ओतून काम केलं होतं. म्हणूनच तर चित्रपट  ऑस्करपर्यंत गेला होता. आजही प्रेक्षकांच्या मनामध्ये या चित्रपटासाठी  वेगळी जागा आहे.

तसेच चित्रपटामध्ये अनेक भूमिकाही फेवरेट आहेत. यातील एक भूमिका इंग्रज तरूणीची भूमिका होती. एलिजाबेथ रसेल असं या भूमिकेचं नाव होतं आणि ही भूमिका साकारली होती रशेल शॅले या अभिनेत्रीने.

ही अभिनेत्री नंतर बॉलिवूडमध्ये पुन्हा दिसली नाही. आता ती कशी दिसत असेल हेही अनेकांना माहीत नाही. अशात तिचे लेटेस्ट काही फोटो समोर आले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून आजही ती चित्रपटात दिसत होती अगदी तशीच दिसत आहे.

रशेलचे हे फोटो इन्स्टाग्रामवर तिच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंच्या कमेंट बॉक्समध्ये तिचे फॅन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण हेच म्हणाले की, तिच्या वयाचा अंदाज लावणं सोपं नाही. तर काही लोकांनी तिच्या ‘लगान’मधील कामाचं कौतुक देखील  केलं आहे. तसेच काही लोक म्हणाले की, त्यांना तिला पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात बघायला आवडेल.

रशेल सोशल मीडियापासून राहते लांब  – रशेलचं ऑफिशिअल इंन्स्टाग्राम पेज नाही. अशात अंदाज लावला जाऊ शकतो की, ती सोशल मीडियापासून लांब राहते. पण तिचं फॅन पेज आहे. ज्यावर तिचे वेगवेगळे फोटो शेअर केले जातात. यातील अनेक फोटो लगान चित्रपटा वेळचे आहेत. दरम्यान रशेल एक मॉडल आणि रायटर आहे. ती ‘द एल वर्ड’ सीरिजमध्ये हेलेना पीबॉडीच्या भूमिकेसाठी ओळखली जाते.

Leave a Comment