‘कोई मिल गया’ चित्रपटामध्ये ‘या’ अभिनेत्याने साकारली होती जादूची भूमिका, जाणून घ्या कोण आहे हा अभिनेता…

चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट इतके प्रसिद्ध झाले की अजूनही त्याची क्रेज कायम आहे. प्रत्येक माणूस चित्रपट पाहताना स्वतःला त्यात अनुभवत असतो.

चित्रपटातील पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. कलाकार आपल्या पात्रात जिवंतपणा आणण्यासाठी खूप मेहनत घेतात.

त्यांनी साकारलेली पात्र वर्षानुवर्षे लक्षात राहतात. अशाच एका पात्राबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. असे पात्र जे अगदी लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या लक्षात राहिले आहे. त्या पात्राची क्रेज अजूनही कायम आहे.

कोई मिल गया या चित्रपटात हृतिक रोशन, प्रीती झीटा यांची प्रमुख भूमिका होती. हा खूप हिट चित्रपट ठरला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. यातील प्रत्येक गाणी अजून देखील प्रेक्षकांच्या ओठी रेंगाळतात.

या चित्रपटाचा जेव्हा जेव्हा विषय निघतो तेव्हा सर्वात जास्त चर्चा होते ती म्हणजे या सिनेमातील जादू या पात्राची. जादू या पात्राने लहान मुलांचे खूप मनोरंजन केले. लहान मुलांना तर जादूच्या या रूपाची भुरळच पडली.

पण तुम्हाला माहीत आहे का जादूच्या पात्राची भूमिका कोणी साकारली होती? आज आम्ही तुम्हाला त्याचा प्रसिद्ध कलाकाराची माहिती करून देणार आहोत. कोई मिल गया या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन हे आहेत.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. प्रेक्षकांनी या चित्रपटाला खूप पसंत केले. त्यातील जादूचे पात्र हे सगळ्याचे आवडते होते.परंतु जादूची भूमिका नक्की कोणी साकारली हे राकेश रोशन यांनी कधीच उघड केले नव्हते. परंतु आता या गोष्टीचा खुलासा झाला आहे.

कोई मिल गया हा चित्रपट २००३ साली प्रदर्शित झाला होता. यातील जादूची अत्यंत महत्वाची भूमिका होती. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे इंद्रवदन पुरोहित. परंतु एक अत्यंत दुःखाची गोष्ट म्हणजे इंद्रवदन आता या जगामध्ये नाहीयेत.

त्यांचा मृत्यू २८ डिसेंबर २०१४ रोजी झाला. त्यांच्या मृत्यूनंतर जादूच्या भूमिकेबद्दल सर्वांना माहिती झाली. जादूच्या भूमिकेचा कॉस्चुम ऑस्ट्रेलियातून ऑर्डर करण्यात आला होता.

Photo Courtesy: Google/CC

या कॉस्चुमची किंमत जवळपास एक करोड रूपांच्या आसपास होती असं सांगण्यात आलं. चित्रपट पाहताना हि भूमिका खूप सोपी वाटत असली, तरी देखील अशाप्रकारची वेशभूषा परिधान करून त्या भूमिकेला न्याय देणे हे खूप चॅलेंजिंग असते.

इंद्रवदन यांनी जादूच्या भूमिकेला न्याय मिळवून दिला. जादूची भूमिका साकारणारे इंद्रवदन यांनी सब टीव्ही वाहिनीवरील बालवीर या मालिकेत देखील काम केले आहे.

बालवीर या मालिकेमध्ये डुबा डुबा हे पात्र त्यांनी अगदी उत्तमरीत्या साकारले होते. बालवीर हि मालिका खूप लोकप्रिय होती. या मालिकेने हॉलिवूमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

हॉलीवूडचा प्रसिद्ध चित्रपट लॉर्ड ऑफ द रिंग या चित्रपटात सुद्धा त्यांनी भूमिका साकारली आहे. इंद्रवदन पुरोहित यांनी आपल्या दमदार अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली.

Leave a Comment