कीर्तनकार शिवलीला पाटील ने दिली गोड बातमी; म्हणाली, ‘एक नाही तर दोन….

शिवलीला बाळासाहेब पाटील महाराष्ट्रातील विनोदी कीर्तनकार आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या गावाच्या त्या रहिवाशी आहेत. २०२१ मध्ये कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३  मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या.(Kirtankar Shivli Patil gave sweet news; She said, ‘Not one but two)

बिग बॉसनंतर आता पुन्हा त्या चर्चेत आल्या आहेत. कारण त्यांनी एक गोड बातमी दिली आहे. त्यामुळे त्यांची खूप चर्चा रंगताना दिसत आहे. शिवलीला पाटील यांच्या घरी एक नाही तर चक्क दोन पाहुण्यांचे आगमन झाल्याची बातमी समोर आली आहे. बघूया काय आहे हे प्रकरण.

बिग बॉस ३ या शोमध्ये कंटेस्टेंट म्हणून शिवलीला पाटील सहभागी झाल्या होत्या. या शोचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते. शिवलीला यांच्यासोबत अनेक कळकरांनी भाग घेतला होता. या शोचा विजेता विशाल निकम बनला होता. तर जय दुधाचा दुसरा  क्रमांक आला होता.

या शोमध्ये विकास पाटील याने अतिशय उत्तम काम केले होते. अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये सहभागी झाले होते. मात्र सगळ्यांचे लक्ष शिवलीला पाटील आणि भूमाता ब्रिगेडच्य अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी वेधून घेतले होते. अविष्कार दार्वेकर, त्याची घटस्फोटीत पत्नी स्नेहा वाघ देखील या शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. मीनल शहा, सोनाली पाटील, मीरा जगन्नाथ, दादुस, सुरेखा कुडची अशे बरेच कलाकार या शोमध्ये सहभागी झाले होते.

या शोमध्ये शिवलीला पाटील यांनी ताप आल्याचे बहाना करून शोच्या बाहेर पडल्या होत्या. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष शिवलीला यांच्या कडे होते. अनेकांनी शिवलीला पाटीलवर टिक्का करायला सुरुवात केली होती त्यामुळे त्या या शोच्या बाहेर पडल्याचे स्वतः त्याने सांगितले होते. एका कीर्तनकार महिलेने समाजाची बदनामी करण्यासाठी अशा प्रकारे एखाद्या रियालिटी शोमध्ये भाग घेऊ नये अश्या टिक्का शिवलीला यांच्यावर केल्या जात होत्या.

तर अनेकांनी वारकरी संप्रदायाची बदनामी करू नये अश्या देखील टिक्का त्यांच्यावर केल्या गेल्या होत्या. त्यामुळे शिवलीला पाटील यांनी हा शो सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी  पंढरपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये शिवलीला यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली होती. माझ्यामुळे भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागते, असं म्हणत शिवलीला यांनी माफी मागितली होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल खूप चर्चा रंगात होत्या.

मात्र यानंतर पुन्हा शिवलीला यांच्याबद्दल चर्चा होताना दिसत आहे. घरी एक नाहीतर दोन पाहूण्याच्या आगमनामुळे त्यांच्याबद्दल चर्चा चालू आहे. त्यांच्या घरचे दोन पाहुणे म्हणजे त्यांनी नुकत्याच दोन गाड्या खरेदी केला आहेत. त्यात एक फोर व्हीलर गाडी आहे  तर दुसरी टू व्हीलर गाडी आहे.

अतिशय महागड्या अश्या गाड्या त्यांनी खरेदी केल्या आहेत. स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंट वरून त्यांनी ही माहिती दिली आहे. माझ्या घरी दोन पाहुण्यांचे आगमन झाले आहे असे कॅप्शन देत शिवलीला यांनी त्यांच्या गाड्यांचे फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोजवर अनेकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Leave a Comment