कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे काजोल, एका चित्रपटासाठी घेते ‘इतके’ मानधन, जाणून व्हाल थक्क…

आपल्या अभिनय कौशल्याने एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणजे काजोल. तिचे लाखो चाहते आहेत. काजोलने वयाच्या १६व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्यावहिल्या चित्रपटाने काजोल चांगली ओळख मिळवून दिली होती.

त्यानंतर तिचा ‘बाजीगर’ हा चित्रपट हिट ठरला आणि काजोलचे संपूर्ण आयुष्य बदलले. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम करत स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली. आज ५ ऑगस्ट रोजी काजोलचा वाढदिवस. त्या निमित्ताने चला जाणून घेऊया तिच्या विषयी काही खास गोष्टी..

काजोल सध्या मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसत असली तरी ती अनेक ब्रँडची अॅम्बेसेडर आहे. ती चित्रपट आणि जाहिरातींसाठी तडगे मानधन घेते. ती कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे.

caknowledge.com दिलेल्या वृत्तानुसार काजोलकडे १८० कोटी रुपयांची संपत्ती आहे. काजोल एका चित्रपटासाठी जवळपास ४ कोटी रुपये मानधन घेत असल्याचे देखील म्हटले जाते.

काजोलचा मुंबईत जुहू येथे आलिशान बंगला आहे. तिच्या बंगल्याचे नाव शिव शक्ती आहे. तसेच काजोलकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. आजवर काजोलला तिच्या चित्रपटांसाठी ६ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. २०१३मध्ये तिला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता.

काही दिवसांपूर्वी काजोलचा ‘त्रिभंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Leave a Comment